photos top 5 winter vacation hill destination near delhi
बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी दिल्लीतील 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 05:59 PM2018-12-05T17:59:25+5:302018-12-05T18:49:23+5:30Join usJoin usNext हिवाळ्यात बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी फिरण्याचे बेत हमखास आखले जातात. दिल्लीमध्ये अनेक प्रसिद्ध हिल स्टेशन असून तेथे मनमुराद फिरण्याचा आनंद लूटता येतो. दिल्लीतील प्रसिद्ध हिल स्टेशनबाबत जाणून घेऊया. मसूरी हे लोकप्रिय ठिकाण दिल्लीपासून 300 किलोमीटर अंतरावर आहे. मसूरीमध्ये गन हिल, म्युनिसिपल गार्डन, तिब्बती मंदिर, कॅमब बॅक रोड, झाडीपानी फॉल, मसूरी झील आणि वाम चेतना केंद्र या ठिकाणी फिरण्याचा आनंद घेता येतो. हिमाचल प्रदेशमध्ये शिमल्यापासून काही उंचीवर कुफरी हे ठिकाण आहे. हिवाळ्यात कुफरी हे फिरण्यासाठी बेस्ट ठिकाण आहे. कुफरीमध्ये पर्यटकांना सुंदर बर्फवृष्टीचा आनंद लूटता येतो. तसेच बर्फापासून स्नो मॅन तयार करण्याची मजा ही घेता येते. उत्तराखंड राज्यातील अल्मोडा जिल्ह्यात राणीखेत हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. फॅमेली ट्रिप, हनीमून ट्रिप सोबतच चित्रपटांच्या शुटींगसाठी ही जागा अत्यंत लोकप्रिय आहे. राणीखेत येथे निसर्गाचा सुंदर अविष्कार पाहायला मिळतो. कांगडापासून 18 किलोमीटर अंतरावर डलहौजी हे ठिकाण आहे. उंच पर्वत रांगा, बर्फाच्छादित वने आणि पर्वत रांगांमुळे डलहौजीला अनेक पर्यटक भेट देत असतात. कसौल हे हिमाचल प्रदेशातील एक छोटसं गाव होतं मात्र कालांतराने आता ते एक प्रसिद्ध हिल स्टेशन झालं आहे. पार्वती नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या ठिकाणी पाहण्यासारखी उत्तम ठिकाणं आहेत. टॅग्स :दिल्लीपर्यटनdelhitourism