रिव्हर राफ्टिंगचे प्लॅन आखताय? मग 'या' ठिकाणी भेट द्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 03:27 PM2018-10-15T15:27:06+5:302018-10-15T15:43:04+5:30

1) ऋृषिकेशमधील गंगा नदी राफ्टिंगसाठी लोकप्रिय आहे. याठिकाणी देशातीलच नाही तर परदेशातील पर्यटक राफ्टिंगचा थरार अनुभवायला येतात.

2) उत्तराखंड येथील अलकनंदा नदी राफ्टिंगसाठी योग्य मानली जाते. अलकनंदा नदी गंगेची उपनदी आहे.ती देवप्रयागमध्ये भागीरथी नदीला मिळते.

3) जर, तुम्ही सिक्किममध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर येथील तिस्ता नदीत राफ्टिंग करणे विसरु नका. सिक्किममधील दरी-खोऱ्यातून वाहणाऱ्या तीस्ता नदीत रॉफ्टिंग करण्याची मजा वेगळीच येईल.

4) कर्नाटकमधील बारपोल नदीतील पांढऱ्या शुभ्र पाण्यात राफ्टिंग करण्याचा आनंद तुम्ही कधीच विसरु शकणार नाही. एकदा का याठिकाणी राफ्टिंग केले, तर तुम्ही पुन्हा येण्यास तयार व्हाल.

टॅग्स :पर्यटनtourism