See Saif Ali Khan's Pataudi Palace special photo
पाहा सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसचे खास फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 04:23 PM2018-05-14T16:23:15+5:302018-05-14T16:23:15+5:30Join usJoin usNext 1935 मध्ये पतौडी पॅलेसचं निर्माण करण्यात आलं होतं. हे पॅलेस 8वे नवाब आणि भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार इफ्तिखार अली हुसैन सिद्दीकी यांनी तयार बनवले होते. इफ्तिखाल अली यांचा मुलगा मंसूर अली म्हणजेच नवाब पतौडी यांनी परदेशातून आर्किटेक्ट बोलवून या पॅलेसचं रिनोव्हेशन केलं होतं. पतौडी पॅलेस लोकप्रिय जागांपैकी एक मानलं जातं. कारण या पॅलेसची किंमत जवळपास 800 कोटी रुपये सांगितली जाते. पण या पॅलेसला हेरिटेज हॉटेल करण्यात आलं आहे. या पॅलेसमध्ये एकूण 150 खोल्या आहेत. या पॅलेसमध्ये काम करण्यासाठी 100 पेक्षा जास्त लोकांना कामावर ठेवण्यात आले होते. या पॅलेसमध्ये अनेक मोठी मैदाने आणि गॅरेज आहेत. इतकेच नाहीतर घोड्यांसाठी इथे एक अस्तबलही आहे. काही दिवसांपूर्वीच इथे काढलेला सैफ अली खानचा आणि तैमुरचा फोटो समोर आला होता. एक मोठी बाब म्हणजे दिल्लीच्या कॅनॉट प्लेसला डिझाईन करणारे रॉबर्ट टोर रसेल यांनीच पतौडी पॅलेसचं डिझाईन तयार केलं होतं. या खानदानी पॅलेसमध्ये सैफच्या दादीची एक शानदार फायप्लेस आणि लायब्ररी आहे. ही लायब्ररी सैफने नव्याने डिझाईन केली आहे. पतौडी पॅलेसचं रिनोव्हेशन सैफ अली खानने केलं होतं. या पॅलेसमध्ये एक मोठं ड्राईंग रुम, 7 बेडरुम आणि बिलियर्स रुमही आहे. टॅग्स :प्रवाससैफ अली खान TravelSaif Ali Khan