राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या काही खास गोष्टी जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 15:18 IST2019-02-28T15:06:56+5:302019-02-28T15:18:25+5:30

भारतातील पहिलं वॉर मेमोरिअल म्हणजेच राष्ट्रीय युद्ध स्मारक तयार झालं असून इंडिया गेटजवळील या वॉर मेमोरिअलमध्ये देशातील तिन्ही सेनेच्या शहीदांचे नाव लिहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ फेब्रुवारीला याचं उद्घाटन केलं होतं. यावेळी तिन्ही दलाचे प्रमुख इथे उपस्थित होते. या ऐतिहासिक स्मारकाचे फोटोही समोर आले आहेत. चला बघुया काही फोटो...
नॅशनल वॉर मेमोरिअलमध्ये देशासाठी शहीद झालेल्या २६००० सैनिकांची नावे लिहिण्यात आली आहेत. यांनी युद्ध आणि वेगवेगळ्या कारवायांमध्ये देशासाठी आपला जीव गमावला होता.
इंडिया गेटजवळ असलेलं स्मारक साधारण ४० एकर परिसरात तयार करण्यात आलं आहे. या स्मारकाचा काही भाग अंडरग्रांऊड आहे.
हे स्मारक तयार करण्यासाठी २२ झाडे तोडली गेली. तर त्या बदल्यात ७१५ झाडे लावण्यात आली.
हे स्मारक तयार करण्यासाठी जवळपास १७६ कोटी रुपये खर्च करण्यात आले.
परमवीर चक्र मिळालेल्या शहिदांची नावे हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिहिण्यात आली आहेत.
या स्मारकातील प्रतिमा आणि परिसर थंड व हिरवा ठेवण्यासाठी इथे १४ लाख लिटरचं एक अंडरग्राऊंड वॉटर सिस्टीम तयार केली आहे.
भींतींवर ग्रेनाइटच्या दगडांवर शहिदांची नावे, रॅंक आणि रेजिमेंटचा उल्लेख आहे. यात भारतीय लष्करातील २५, ५३९, नौसेनेच्या २३९ आणि वायूसेनेच्या १६४ शहिदांची नावे आहेत.
तसेच इथे परमवीर चक्र मिळालेल्या२१ जवानांच्या कास्यांच्या प्रतिमा आहेत.