Six countries inexpensive at cheap prices near India
भारताजवळील स्वस्तात मस्त सहा देश By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 06:24 PM2018-12-12T18:24:57+5:302018-12-12T18:37:15+5:30Join usJoin usNext तुम्ही कुटुंबियांसोबत कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आज आम्ही तुम्हाला अशा 6 देशांबद्दल सांगणार आहोत. जिथे अगदी कमीत कमी म्हणजे 70 रुपयांत तुम्हाला जेवण मिळू शकते आणि 300 रुपयांपर्यंत राहण्याची सोय होऊ शकते. थायलंड : पांढ-या हत्तीचा देश म्हणून असलेल्या थायलंडमध्ये सुट्टीचा तुम्ही चांगला आनंद घेऊ शकता. हा देश सुंदर असण्याबरोबरच भरपूर स्वस्त देखील आहे. कम्बोडिया : कम्बोडिचं अंकोरवाट मंदिर तर सगळ्यांनाच माहीत आहे. जर तुम्ही देखील या प्राचीन मंदिराचं दर्शन घेऊ इच्छिता तर कंबोडिया जाण्याची लगेच तयारी करा. कारण कंबोडियात देखील तुम्हाला 300 ते 1000 रुपयांत राहण्यास रूम उपलब्ध होईल. तसेच हॉटेलमध्ये चांगलं जेवण देखील कमी दरात मिळेल. व्हिएतनाम : व्हिएतनाम देखील एक सुंदर जागा आहे. या देशात फक्त 60 ते 70 रुपयांत व्हिएतनामी जेवण मिळतं. ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता आणि व्हिएतनाममध्ये राहणं देखील अधिक स्वस्त आहे. बल्गेरिया : बल्गेरिया दक्षिण-पूर्वी युरोपमधील एक सुंदर देश आहे. बल्गेरियामध्येही तुम्हाला जेवण आणि राहणं अगदी स्वस्त दरात उपलब्ध होईल. बल्गेरियामध्ये तुम्ही अगदी स्वस्तात तुम्ही सुट्टी घालवू शकता. भूतान : भारताचा शेजारी देश म्हणजे भूतान. या देशात फिरण्यासाठी तुम्हाला बजेटची काळजी करण्याची काहीच गरज नाही. इथले प्राचीन मंदिर नेहमीच आकर्षण असतात. भूतानमध्ये फक्त 100 रूपयांत अगदी स्वादिष्ट जेवण मिळेल. तसेच या देशात राहण्यासाठी तुम्हाला खूप कमी खर्च करावा लागेल. नेपाळ : नेपाळमध्येही तुमचं अगदी स्वस्तात मस्त फिरणं होऊ शकतं. इथे 50 रुपयांपर्यंत तुम्हाला राहण्याची व्यवस्था होऊ शकते. तर भारतीय पद्धतीचं जेवणही कमी दरात मिळतं.