'हा' आहे नरकाचा दरवाजा, येथे गेलेला माणूस कधीही परत येत नाही कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 06:24 PM 2022-04-29T18:24:59+5:30 2022-04-29T18:55:57+5:30
जगात अनेक विचित्र अन् भयानक गोष्टी आहेत. काही रहस्यमय गोष्टींचे सत्य अजुनही उलगडलेले नाही. असंच एक मंदीर आहे जेथे गेल्यावर माणूस कधीही परत येत नाही. तिथे गेल्यावर मृत्यू हा अटळ आहे. असं काय रहस्य लपलंय या मंदिरात पाहा. या मंदिराच्या दारातून आत गेल्यावर कुणीही परत येत नाही म्हणून याला गेट ऑफ हेल म्हणतात... हे मंदिर तुर्कीचे प्राचीन शहर हेरापोलिसमध्ये आहे. असं म्हणतात जो या मंदीराच्या प्रवेशद्वारातून आत जातो तो पुन्हा कधीच बाहेर येत नाही.
भयानक म्हणजे या मंदिरात त्या मृत्यू झालेल्या लोकांचा मृतदेहही सापडत नाही.
'सायन्स अलर्ट डॉट कॉम'नुसार मागील अनेक वर्षांत असे मृत्यू होत आहेत. विशेष म्हणजे या मंदिरात गेलेल्या पशुंचाही मृत्यू होत आहे.
या कारणामुळे हा नरकाचा दरवाजा म्हणून ओळखला जातो.
या मंदिराबाबत लोकांची अशी समजुत आहे की या मंदिरातील युनानी देवतेच्या विषारी श्वासांमुळे हे मृत्यू होत आहेत.
ग्रीक रोमन काळात याबाबत एक कायदा बनवण्यात आला होता की जो कुणी या मंदिरात जाईल त्याचे मुंडके उडवण्यात येईल.
पण वैज्ञानिकांनी या रहस्यमय मृत्यंचे रहस्य उलगडले आहे.
वैज्ञानिकांच्या मते या मंदिराच्या खाली मोठ्याप्रमाणात कार्बन डायोक्साईड आहे त्यामुळे माणसांचा, पशु-पक्ष्यांचा तिथे गेल्यावर मृत्यू होतो.
या गुहेमध्ये ९१ टक्के कार्बन डायोक्साईड आहे जो तीस मिनिटात माणसाला मृत्यूच्या दाढेत ढकलु शकतो.
याच मंदिराच्या गुबेतून येणाऱ्या वाफेच्या संपर्कात आलेले पशुपक्षीही यामुळेच दगावतात.