Temple in pakistan where hindu as well as muslim's goes to visit myb
पाकिस्तानातील 'या' मंदिराला हिंदूच नाही तर मुसलमान सुद्धा करतात वंदन, काय आहे रहस्य..... By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 04:23 PM2020-02-27T16:23:38+5:302020-02-27T16:37:50+5:30Join usJoin usNext भारतातील हिंदूच्या वास्तु आणि ऐतिहासीक स्थळ आपल्याला माहीतच आहेत. भारतात अशी अनेक मंदीर आहेत जी जगभरात प्रसिध्द आहेत. मोठ्या संख्येने भारतातील भक्त आणि विविध धर्मातील उपासक मंदिरांना भेटी देण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी येत असतात. तुमचा ऐकून विश्वास बसणार नाही. पण भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानात सुद्धा एक हिंदूंचे मंदिर आहे. या मंदिरात मुस्लिम लोक सुद्धा वंदन करतात. पाकिस्तानातील बलुचिस्तानातील या मंदिरात हिंगलाज देवीची पुजा केली जाते. त्याच ठिकाणी पाचमुखी हनुमानाचे मंदीर सुद्धा आहे. हे मंदिर जवळपास २००० वर्ष जुनं आहे. याशिवाय पाकिस्तानात अनेक राममंदिरं सुद्धा आहेत. सगळ्यात प्रसिध्द असलेले इस्लामकोटचं राममंदिर आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तानातील या मंदिरात हिंगलाज देवीची पुजा केली जाते. या मंदिराला अनेक वर्ष जुना इतिहास आहे. असं मानलं जातं की भगवान शंकराने माता सतीचा मृतदेह आपल्या मांडीवर घेतला होता. त्यावेळी भगवान विष्णुंनी माता सतीचं डोकं कापण्यासाठी चक्र फेकले होते. त्यावेळी माता सतीचे डोकं पृथ्वीवर याच जागी पडले होते. त्यानंतर हिंगलाज मातेच्या मंदिराच्या नावाने हे मंदिर ओळखलं जाऊ लागलं. पाकिस्तानच्या बलुचिस्तानपासून १२० किलोमीटर अंतरावर हिंगूल नदीच्या काठी हे मंदिर आहे. ५१ शक्तीपीठांमध्ये या मंदिराचा सुद्धा समावेश होतो. मुगलांनी अनेकदा या पवित्र मंदिराला लुटण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील मोहम्मद गजनी हा प्रमुख होता. त्यानंतर मोहम्मद बिन कासिम याने या मंदिराला लुटण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीचा उल्लेख १५०० वर्षापूर्वी फिरण्यासाठी आलेल्या बौद्ध भिक्षुच्या वृत्तांतात मिळाला आहे. स्वामी नारायण मंदीर पाकिस्तानातील कराची या शहरात आहे. हे मंदीर १६० वर्ष जुनं आहे. ज्या भक्तीने या मंदिरात हिंदू वंदन करण्यासाठी येतात. त्याच भक्तीभावाने मुसलमान सुद्धा येतात. हिंदू आणि मुसलमान याच्या प्रेमाचे प्रतीक असणारी ही मंदीरं आहेत. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सTravel Tips