या आहेत जगातल्या सर्वात सुंदर आणि लक्झरी रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 01:38 PM2018-05-16T13:38:59+5:302018-05-16T13:38:59+5:30

रॉकी माऊंटेनिअर - पश्चिम कॅनडामध्ये 12 दिवसांची लक्झरी आणि अॅडव्हेंचरस राइड या रेल्वेत मिळू शकते. रॉकी डोंगर रागांमधून जाणारी हे रेल्वे सगळ्याच सुविधा आणि मनोरंजनाची काळजी घेतात. प्रवासात खिडकीतून दिसणारं मनमोहक दृश्य तुम्हाला वेगळाच आनंद देणारं ठरु शकतं.

दी घान - दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये डार्विन ते अॅडेलिड दरम्यान 2,979 किमीचा प्रवास करणं खास अनुभव असेल. या रेल्वेमध्ये सगळ्यास आधुनिक सोयीसुविधा आहे. इतकेच नाहीतर या रेल्वेने प्रवास करताना तुम्हाला एक रात्र खुल्या आकाशाखाली राहण्याचीही संधी मिळेल.

गोल्ड इगल ट्रान्स-सायबेरियन एक्सप्रेस - सायबेरियाचं सौंदर्य बघायचं असेल तर या रेल्वेपेक्षा दुसरा चांगला पर्याय असू शकत नाही. 2007 मध्ये सुरु झालेल्या या रेल्वेने तुम्ही ताज्या पाण्याच्या झऱ्याचा नजारा पाहू शकता. सोबतच रेल्वेमध्ये रेस्टॉरन्ट आणि बारही आहे.

पॅलेस ऑन व्हिल्स - रेल्वेत हॉटेल सर्व्हिस देणारी पॅलेस ऑन व्हिल्स भारतातील पहिली रेल्वे आहे. एका आठवड्याच्या प्रवासात प्रवासी जयपूर, जोधपूर, चित्तोडगढ, जेसलमेर, उदयपूर आणि आग्रा हे ठिकाणे बघू शकतील. या रेल्वेत फर्स्ट क्लास रुम्स, बार, स्पा सलून आणि महाराजा-महाराणी रेस्टॉरन्ट आहेत.

दी ब्लू ट्रेन - दक्षिण आफ्रिेकेच्या प्रीटोरिया आणि केप टाऊन दरम्यान ही रेल्वे एका महिन्यात केवळ 8 वेळा धावते. 27 तास आणि 994 किमीच्या या प्रवासात तुम्हाला अनेक मनमोहक नजारे बघायला मिळतील.

टॅग्स :प्रवासTravel