These cities are the best in India for Destination Wedding
डेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 03:46 PM2020-01-23T15:46:45+5:302020-01-23T15:55:35+5:30Join usJoin usNext वाराणसी- जर तुम्ही आध्यात्मिक असाल तर वाराणसी हे लग्न करण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे. जिथे तुम्ही लग्न करू शकता. इथे लग्न केल्यास वयोवृद्धांनाही आवडेल. लग्नानंतर तुम्ही बाबा काशी विश्वनाथाचं आशीर्वादही घेऊ शकता. इथे तुम्ही गंगा घाटासह अनेक पर्यटन स्थळांचा आनंद घेऊ शकता. हृषिकेश- गंगेच्या किनाऱ्यावर असलेले शहर फारच सुंदर आहे. इथे आपल्याला बरेच पर्याय उपलब्ध आहेत. लगन करण्यासाठी हे ठिकाण एकदम बेस्ट आहे. इथल्या बऱ्याच हॉटेलमध्ये वेडिंग डेस्टिनेशन होतं. दिल्लीहून जवळ असल्यानं हृषिकेश वेडिंग डेस्टिनेशनसाठी लोक जातात. पुष्कर- पुष्कर हे राजस्थानमधलं छोटंसं जुनं शहर आहे. या शहरात आपण रॉयल वेडिंगचा अनुभव घेऊ शकता. या शहरात अनेक ऐतिहासिक राजमहाल आहेत. जे डेस्टिनेशन वेडिंगसाठी एकदम योग्य आहेत. शेखावाटी- जर राजस्थानमधल्या जोधपूर आणि उदयपूरसारख्या महागड्या रिगल डेस्टिनेशनएवढा तुमचा बजेट नसल्यास शेखावटी हे चांगलं ठिकाण आहे. जे पर्यटकांच्यामध्ये कमी परिचित आहे. परंतु हे एका विवाह सोहळ्यासाठी भारी डेस्टिनेशन आहे. केरळ- केरळमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणं फार काही महागातलं काम नाही. इथे आपल्याला प्राकृतिक सुंदरता मिळते. वेडिंगसाठी केरळमध्ये अनेक सुंदर डेस्टिनेशन आहेत, परंतु अलेप्पी या सर्वात सुंदर आहे. इथे असलेले बीच, बॅकवॉटर, लगून अलेप्पी एकदम परफेक्ट डेस्टिनेशन आहे.