Top 10 best Resort in india - Reserves of 'Money Vision' in India
यह आराम का मामला है - भारतातील 'पैसा वसूल' रिसॉर्ट्स By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 01:44 PM2018-12-24T13:44:02+5:302018-12-24T14:26:09+5:30Join usJoin usNext जयपूर येथील द ओबेरॉय राजविलास हे हॉटेल लक्झरीयस जगण्याचा अनुभव घेण्यासाठी उत्कृष्ट ठिकाण आहे. जयपूरमधील रामबाग पॅलेस हे हॉटेलही आकर्षणाचा अन् लक्झरीयस जगण्याचा अनुभव तुम्हाला देऊन जातो. हे रिसार्ट म्हणजे तुमच्या पैशांची संपूर्ण वसुली. उदयपूरमध्ये ताज लेक पॅलेसमध्ये 66 लक्झरीयस रुम्स आणि 17 सुट्स आहेत. यंदाच्या वर्षातील टॉप 10 लक्झरीयस हॉटेल्सपैकी ते एक आहे. केरळमधील द ललित रिसॉर्ट आणि स्पा हेही रॉयल जीवनाचा आनंद घ्यायचा असल्यास बेस्ट ऑफ द इंडिया असं ठिकाण आहे. आग्र्यातील 'द ओबेरॉय अमरविलास' हे रिसॉर्टही बेस्ट अँड बेस्टपैकी एक आहे. ताजमहालपासून केवळ 6 किमी अंतरावर हे रिसॉर्ट असून पर्यंटकांची येथे गर्दी असते. बंगळुरू फिरायला जाताय, मग रेल्वे स्थानकापासून केवळ 4 किमी अंतरावर द पॉल हे क्लीन अन् पॉश हॉटेल आहे. जेथे निवासाचा अनुभव विस्मरणीय आहे. पर्यटक बनून जेव्हा तुम्ही फिरायला जाल, तेव्हा कुर्ग येथील तमारा या निसर्गरम्य हॉटेलमध्ये राहायला विसरू नका. गुडगाव येथील हॉटेल ट्रायडेंट हेही पर्यकांसाठी लक्झरीयस पर्वणी आहे. 7 एकर परिसरात हे रिसॉर्ट पसरले असून दिल्ली दौऱ्यात येथे एकदा भेट द्यायलाच हवी. जोधपूरमधील उमेद भवन पॅलेस येथेही राजेशाही थाट अनुभवण्यासारखा आहे. हे जगातील सर्वात मोठ्या रिसॉर्टपैकी एक आहे. अद्भूत निसर्ग सौंदर्याचा नमुना म्हणजे शिमला, अन् शिमल्याचं लक्झरीयस सौंदर्य म्हणजे वाईल्ड फ्लॉवर हॉल. चारी बाजुंनी झाडांनी वेढलेलं हे निवास्थान. टॅग्स :पर्यटनहॉटेलtourismhotel