top 5 longest railway tunnels in the world
'हे' आहेत जगातील सर्वात लांब रेल्वे बोगदे By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 03:23 PM2018-09-04T15:23:01+5:302018-09-04T15:44:53+5:30Join usJoin usNext जगभरातील अनेक ठिकाणांशी संपर्क साधनं सोयीचं व्हावं, लोकांशी पटकन कनेक्ट होता यावं या दृष्टीने रेल्वेचे बोगदे खोदले जातात. स्विस इंजिनिअर कार्ल एडुअर्ड गूरनरने 1947 रोजी स्विझर्लंडमध्ये सर्वप्रथम सर्वात लांब रेल्वे बोगदा तयार करण्याची संकल्पना मांडली होती. जगातील सर्वात लांब रेल्वे बोगदे कोणते हे जाणून घेऊया. स्विझर्लंडमधील गोटहार्ड बेस बोगदा हा जगातील सर्वात लांब बोगदा आहे. या बोगद्याची लांबी ही 57 किलोमीटर असून तो तयार करण्यासाठी तब्बल 17 वर्ष लागली. गोटहार्ड बेस बोगद्याआधी जपानमधील सेकेन रेल्वे बोगदा सर्वात मोठा होता. 53.85 किलोमीटर इतकी बोगद्याची लांबी असून जपानमधील जनतेसाठी 13 मार्च 1988 मध्ये तो खुला करण्यात आला. चॅनल बोगदा हा जगातील तिसरा सर्वात लांबी असलेला रेल्वेचा बोगदा आहे. 50.50 किलोमीटर इतकी या बोगद्याची लांबी असून 6 मे 1994 मध्ये त्याचा वापर करण्यास सुरुवात झाली. न्यू गुंजाओ बोगदा हा चीनमध्ये असून त्याची लांबी ही 32.65 किलोमीटर आहे. चीनमधील जनतेसाठी 28 डिसेंबर 2014 मध्ये हा बोगदा खुला करण्यात आला. लॉस्चबर्ग बेस हा स्विझर्लंडमधील बोगदा जगातील पाचव्या क्रमांकावर असलेला सर्वात लांब बोगदा आहे. 14.62 इतकी या बोगद्याची लांबी आहे. टॅग्स :स्वित्झर्लंडचीनSwitzerlandchina