'या' देशांमध्ये पर्यटकांसाठी आहेत खूप कडक कायदे; प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 06:03 PM2024-09-12T18:03:51+5:302024-09-12T18:44:13+5:30

tourist countries : पदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रत्येक देश हा काही नियम आणि कायदे लागू करतो.

पर्यटकांसाठी अतिशय कडक नियम आणि कायदे आहेत. अशा यादीत पहिले नाव सिंगापूरचे आहे. येथे, रस्त्यावर थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे आणि च्युइंगम चघळणे यावर दंड आकारला जातो. तसेच, रस्ता ओलांडताना निष्काळजीपणा आणि सार्वजनिक शौचालय वापरल्यानंतर फ्लश न केल्याबद्दल तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.

संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये सार्वजनिक ठिकाणी तुमच्या जोडीदाराचा हात धरण्यास किंवा चुंबन घेण्यास बंदी आहे. यासाठी तुरुंगात जावे लागू शकते. येथे ड्रग्ज लॉ अतिशय कडक आहे. यासाठी तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो.

सौदी अरेबियामध्ये ड्रग्जशी संबंधित काहीही आढळल्यास तुम्हाला फाशीची शिक्षाही होऊ शकते. तसेच, मक्का आणि मदिना येथील काही ठिकाणी गैर-मुस्लिम लोकांच्या प्रवेशावर बंदी आहे.

थायलंड हे कठोर नियमांसाठी ओळखले जाते. या देशात अमली पदार्थांच्या वापराबाबत अतिशय कडक कायदे आहेत. तस्करीच्या बाबतीत, तुम्हाला येथे फाशीची शिक्षा देखील होऊ शकते. सरकारवर टीका केल्यास किंवा त्याविरुद्ध आक्षेपार्ह शब्द वापरल्यास जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

जर तुम्ही जपानला भेट देण्याचा विचार करत असाल तर येथेही काही नियम आहेत. या देशात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो. या देशात धुम्रपानासाठी ठिकाणे तयार करण्यात आली आहेत, या ठिकाणांव्यतिरिक्त कुठेही धूम्रपान केल्यास दंड आकारला जातो. येथे मद्यपान आणि वाहन चालविण्यास सक्त मनाई आहे. यासाठी येथे झिरो टॉलरेंस पॉलिसी आहे.

जर तुम्ही कतारमध्ये फिरायला गेलात तर येथील काही ठिकाणी दारू पिणे पूर्णपणे निषिद्ध आहे. तसेच, येथे सार्वजनिक ठिकाणी तुमच्या जोडीदाराचे चुंबन घेण्यास सक्त मनाई आहे आणि तसे केल्यास तुम्हाला शिक्षा होऊ शकते. याशिवाय, सार्वजनिक ठिकाणी महिलांनी आपले खांदे आणि गुडघे झाकले पाहिजेत असा नियम आहे.

जर तुम्ही इंडोनेशिया देशाला भेट देणार असाल तर तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की, येथे ड्रग्ज लॉ खूप कडक आहे आणि तस्करी झाल्यास मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. प्रसिद्ध पर्यटन स्थळ बाली येथील मंदिरात जाताना तुम्हाला ड्रेस कोड पाळावा लागेल. येथे, आपल्या जोडीदाराचे चुंबन घेणे किंवा सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह गोष्टी करणे कठोरपणे प्रतिबंधित आहे.