Travel Piece on Shoghi in Himachal
उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी हिमाचलमधील ऑफबीट ठिकाण 'शोघी'! By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 12:56 PM2019-04-10T12:56:55+5:302019-04-10T13:07:01+5:30Join usJoin usNext हिमाचल प्रदेश नेहमीच आपल्या सुंदरतेसाठी जगभरात चर्चेत असतो. इथे शिमला, कुल्लू-मनाली, कसौली, धर्मशाला, मॅरलॉडगंज, डलहौजी आणि खजियार अशी कितीतरी सुंदर ठिकाणे फिरण्यासाठी आहेत. पण या ठिकाणांसोबतच हिमाचलमधील शोघी हे छोटसं ठिकाणही पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. या गावात तुम्हाला पावला पावलावर मंदिरे बघायला मिळतील त्यामुळे या गावाला सिटी ऑफ टेम्पल असंही म्हणतात. चला जाणून घेऊ या ठिकाणाची खासियत...(Image Credit : traveldglobe.com) १) तारा देवी मंदिर - येथील आकर्षणाचं प्रमुख केंद्र आहे तारा देवी मंदिर. २५० वर्ष जुनं हे मंदिर भाविकांमध्ये चांगलंच लोकप्रिय आहे. शिमलापासून जवळपास १३ किमी अंतरावर असलेल्या शोघी नॅशनल हायवे-२२ जवळ साधारण ५७०० फूट उंचीवर हे ठिकाण आहे. शहाराच्या गर्दीपासून दूर दाट-हिरव्यागार जंगलात आणि उंचच उंच डोंगरानी वेढलेले शोघी पाहता क्षणीच डोळ्यात भरतं. (Image Credit : famousplacesinindia.in) २) ताजी फळं आणि ज्यूससाठी प्रसिद्ध - शोघी ताज्या फळांच्या ज्यूससाठी हिमाचलमध्ये प्रसिद्ध आहे. येथील कारखान्यांमध्ये तयार होणारे ज्यूस नेहमीच चर्चेत असतात. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचं उप्तादन घेतलं जातं. (Image Credit : biharimati.com) ३) ट्रेकिंग आणि कॅम्पिंग - अनेक मंदिरांसोबतच हे ठिकाण ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसाठीही लोकप्रिय आहे. पर्यटक येथील जंगलात आणि डोंगराळ रस्त्यांवरून ट्रेकिंग करतात. तसेच इथे निसर्गाची फोटोग्राफी करण्याचा आनंदही वेगळाच असतो. (Image Credit : www.sunrisevilla.in) ४) काय बघाल - शोघीमध्ये तारा देवी मंदिरासोबतच इतरही अनेक ठिकाणे आहेत. यात काली मंदिर, हनुमान मंदिर, जाखू हिल, वाइसरेगल लॉज आणि कंडाघाट हे आहेत. (Image Crdit : www.hostinger.in) ५) काय खाल? - डोंगराळ भागात वेगवेगळे स्थानिक पदार्थ खाण्याची वेगळीच मजा असते. इथे तुम्हाला हिमाचल प्रदेशातील वेगवेगळे पदार्थ सहजपणे खायला मिळतील. येथील लोणचं, ज्यूस, शरबत आणि जेली पर्यटकांना फार पसंत आहे. (Image Credit : www.yatra.com) ६) कधी जाल ? - इथे वर्षभर वातावरण चांगलं असतं. पण सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान इथे जाण्यासाठी सर्वात चांगला वेळ मानला जातो. तसेच नोव्हेंबर ते जानेवारी इथे बर्फाचा आनंद तुम्ही घेऊ शकता. तर फेब्रुवारी ते जूनपर्यंत तुम्ही उन्हाळ्यात थंड अनुभव घेण्यासाठी येऊ शकता. (Image Credit : www.adventurenation.com) ७) कसे पोहोचाल? - शोघी हे ठिकाण दिल्लीहून साधारण ३७० किमी अंतरावर आहे. तर चंडीगढहून केवळ १०० किमी अंतरावर. इथे तुम्ही तुमच्या वाहनानेही जाऊ शकता. तसेच दिल्ली ते शिमला रेल्वेनेही जाऊ शकता. इथून तुम्हाला शोघीला जाण्यासाठी बसेस आणि टॅक्सी मिळतील. (Image Credit : www.urbanrabbit.in)टॅग्स :हिमाचल प्रदेशट्रॅव्हल टिप्सHimachal PradeshTravel Tips