Underground places on earth who looks like heaven
स्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 04:21 PM2019-09-20T16:21:13+5:302019-09-20T16:25:29+5:30Join usJoin usNext ओजार्क्स कवेर्न्स गुहा, अमेरिका अमेरिकेतील मिसौरी प्रांतात असलेली गुहा 1880मध्ये शोधण्यात आली होती. या गुहेचं नाव ओजार्क्स कवेर्न्स असं आहे. ही गुहा एन्जल शॉवर्स म्हणूनही प्रसिद्ध आहे. या गुहेत वरच्या बाजूने एखाद्या केल्साइटपासून तयार करण्यात आलेल्या बाथटबसारख्या आकृतीमध्ये पाणी पडत असतं. हे मनमोहक दृश्य पाहून स्वर्गातच आल्यासारखा भास होतो. रीड फ्लूट गुहा, चीन वेगवेगळ्या रंगाच्या लाइमस्टोन्सनी सजलेली ही गुहा जवळपास 180 मिलियन वर्ष जुनी आहे. चीनमध्ये स्थित असणाऱ्या या गुहेला दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये एका जपानी सैनिकाने शोधलं होतं. याला रीड फ्लूट गुहेच्या नावानेही ओळखलं जातं. असं म्हटलं जातं की, या पृथ्वीवर कुठेही स्वर्ग असेल तर तो काहीसा असाच असेल.प्यूर्टो प्रिंसेसा की भूमिगत नदी ही जगातील सर्वात लांब आणि भूमिगत नदी आहे. याला प्यूर्टो प्रिंसेसा या नावानेही ओळखलं जातं. वर्ष 2012मध्ये जगभरातील सात आश्चर्यांमध्ये सहभागी करण्यात आलेली ही भूमिगत नदी फिलीपाइन्सच्या पलवान बेटावर स्थित आहे. येथील दृश्य पाहणं म्हणजे खरचं स्वर्ग सुख. सलीना तुरडा, रोमानिया रोमानियाच्या ट्रांसिल्वानिया जवळ असलेलं मिठाची खाण 1992मध्ये पर्यटकांसाठी खुली करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत 20 लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. या खाणीला सलीना तुरडा या नावानेही ओळखलं जातं. वाइटोमो ग्लोवॉर्म गुहा, न्यूझीलंड ग्लोवॉर्म या नावाने ओळखली जाणारं खास फंगस फक्त न्यूझीलंडमध्ये आढळून येतं. ग्लोबॉर्म असल्यामुळे या गुहेमध्ये जणू आकाशातील चांदणं जमिनीवर उतरल्याप्रमाणे वाटतं. या गुहेचं नाव वाइटोमो ग्लोवॉर्म गुहा असं ठेवण्यात आलं आहे. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सपर्यटनआंतरराष्ट्रीयTravel TipstourismInternational