'या' व्हॅलेंटाईन डे फिरायला जाण्याचा प्लॅन आहे? ही आहेत पुण्याजवळील १० रोमॅंटिक डेस्टिनेशन्स.... By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 11:35 AM 2021-02-11T11:35:16+5:30 2021-02-11T11:49:48+5:30
पुणे(Pune) शहराच्या आजूबाजूला अनेक रोमॅंटिक डेस्टिनेशन्स (Romantic Destination) आहेत. जिथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत व्हॅलेंटाईन डे (Valentine Week) एन्जॉय करू शकाल. अशाच काही स्पेशल ठिकाणांची आम्ही तुम्हाला देणार आहोत. नव्या वर्षाला सुरूवात झाल्यावर खासकरून तरूणाईला उत्सुकता असते ती फेब्रुवारी महिन्याची. कारण या महिन्यात असतो त्यांच्या आवडीचा व्हॅलेंटाईन डे(Valentine's Day). देशभरात व्हॅलेंटाईन डे जल्लोषात साजरा केला जातो. यादरम्यान जर तुम्ही पुणे(Pune) शहरात असाल तर येथील रोमॅंटिक वातावरण तुम्हाला चांगलंच आवडेल. हा व्हॅंलेटाईन डे तुम्ही इथे अधिक चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकाल. इथे तुम्हाला खाण्यासाठी वेगवेगळे पर्याय आहे. सोबतच अनेक ऐतिहासिक ठिकाणांनाही तुम्ही भेट देऊ शकता. त्यासोबत पुणे शहराच्या आजूबाजूला अनेक रोमॅंटिक डेस्टिनेशन्स (Romantic Destination) आहेत. जिथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत व्हॅलेंटाईन डे एन्जॉय करू शकाल. अशाच काही स्पेशल ठिकाणांची आम्ही तुम्हाला देणार आहोत.
घोराडेश्वर हिल्स - जर विषय रोमॅंटिक डेस्टिनेशनचा असेल आणि पुण्याच्या जवळ फिरायचं असेल तर तुमच्या यादीत घोराडेश्वर हिल्स हे ठिकाण आवर्जून नोंदवा. अॅडव्हेंचरची आवड असणाऱ्या कपलसाठी हे एकदम परफेक्ट ठिकाण आहे. ३० मिनिटांचा ट्रेक करून तुम्ही टेकडीवर पोहोचू शकता. थंडगार वारा आणि हिरवळ अजून यापेक्षा रोमॅंटिक वातावरण काय हवंय. पुणे शहरापासून हे ठिकाण २५ किलोमीटर अंतरावर आहे.
पवना लेक - लोणावळयाजवळ असलेल्या पवना धरण परिसराचे सौंदर्य पावसाळ्यात अधिक खुलून येतं. मात्र, हिवाळ्यातही पवना धरणाचं वातावरण अधिक रोमॅंटिक होतं. त्यामुळे तुम्ही इथे व्हॅलेंटाईन डे निमित्त फिरायला जाऊ शकता. पवना धरण परिसरात कॅम्पिंगची सुद्धा सुविधा आहे. ज्यासाठी पर्यटक खास येतात. पुणे शहरापासून हे ठिकाण जवळच आहे.
एम्प्रेस गार्डन - एम्प्रेस गार्डन ही पुण्यातील एक ऐतिहासिक बाग उद्यान एकूण ३९ एकर परिसरामध्ये विस्तारले आहे. वर्षभरातल्या बदलत्या ऋतूंतील निसर्ग सौंदर्याचे स्वरूप लोकांना पहावयास मिळावे अशी या गार्डनची रचना करण्यात आली आहे. या उद्यानात फिरताना हिरवळ, तळी, पाण्याचा सर्वांचा अनुभव घेता येतो. तब्बल दोनशे वर्षांचा महाकाय वड, एखाद्या वृक्षाच्या खोडाएवढी जाडी असलेला दुर्मिळ कांचनवेल यांसह सुमारे अठराशे देशी-परदेशी वृक्षांची संपदा असलेल्या दीडशेहून अधिक वर्षे जुन्या एम्प्रेस गार्डन या पुण्याच्या मानबिंदू.
मुळशी धरण - पुणेकरांच्या मनाला पावसाळ्यात बहर आणणार, हिवाळ्यात गारवा अन् ऊन्हाळ्यात निरव शांतता देणारं, मुळशी धरण हे पुणे जिल्ह्यातील मुळा नदीवरील धरण आहे. इथेही भेट देऊनही तुम्ही व्हॅंलेटाईन डे भारी साजरा करू शकता. दुरवर पसरलेलं पाणी, त्यात पक्ष्यांची सदाबहार गाणी.. सभोवताली विस्तारलेली वनराई, मनाला सुखाऊन जाई.. स्वच्छ हवा, त्यात तो पाऊस नवा.. क्षणभर विश्रांती देणार मुळशी हे पुणेकरांच हक्काच पर्यटन स्थळ..
सिंहगड - पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. हे सुद्धा एक रोमॅंटिक डेस्टिनेशन आहे.
लोणावळा - तुम्ही व्हॅलेंटाईन डे निमित्त रोमॅंटिक डेस्टिनेशनच्या शोधात असाल तर तुम्ही लोणावळ्याला भेट देऊ शकता. हे पुण्यापासून आणि मुंबईपासूनही जवळ आहे. सोबतच थंडगार वारा आणि मनाला भावणारी हिरवळ तुमच्या मनात घर करेल. व्हॅंलेंटाईन डे साठी हे परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकतं.
लवासा - निसर्ग आणि प्रेम यांचं अतुट नातं आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात पार्टनरसोबत वेळ घालवायचा असेल तर तुम्ही पुण्याहून लवासाला जाऊ शकता. हे ठिकाण पुण्यापासून ५७ किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही इथे जातानाच या ठिकाणाच्या प्रेमात पडाल. पार्टनरला फिरायला घेऊन जाण्यासाठी हे परफेक्ट डेस्टिनेशन म्हणतात येईल. शिवाय तुम्ही एका दिवसात परत येऊ शकता.
कामशेत - तुम्ही अॅडव्हेंचर, थरार आवडणारं कपल असाल तर तुम्ही या व्हॅलेंटाईन डे ला कामशेतला जाऊ शकता. हे एक रोमॅंटिक हिल्स स्टेशन असून तुमचा पैसा नक्की वसूल होईल. इतकेच काय तर तुमच्या पार्टनरला येथील निसर्गाचा नजारा नक्की आवडेल. सोबतच येथील शांतता तुम्हाला दोघांना आणखी जवळ आणेल.
कुणे धबधबा - कुणे धबधबा महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील धबधबा आहे. तीन टप्प्यांत २०० मीटर कोसळणारा हा धबधबा भारतातील धबधब्यांपैकी १४व्या क्रमांकाचा उंच धबधबा आहे. पैकी सगळ्यात उंच टप्पा १०० मीटर चा आहे. हे सुद्धा तुमच्यासाठी व्हॅलेंटाईन डे साठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे.
कर्जत - हे ठिकाण पुणे शहरापासून थोडं लांब आहे. पण व्हॅलेंटाईन डे साठी परफेक्ट डेस्टिनेशन म्हणता येईल. कारण येथील हिरवळ, धुकं एकदम रोमॅंटिक आणि परफेक्ट वातावरण आहे. हे ठिकाण पुणे शहरातून १०२ किलोमीटर अंतरावर आहे.