varanasi most famous tourist places people come from all over the world to banaras
वाराणसीतील 'ही' शानदार ठिकाणं, जगभरातून भेट देण्यासाठी येतात पर्यटक! By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 03:26 PM2023-05-29T15:26:25+5:302023-05-29T15:49:09+5:30Join usJoin usNext वाराणसीत 12 ज्योतिर्लिंगांपैकी श्री काशी विश्वनाथ मंदिर हे मुख्य आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी हे ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. काशी विश्वनाथ धाम बांधल्यानंतर जगभरातील पर्यटकांची येथे ये-जा सुरू आहे. जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत वाराणसीला जाण्याचा विचार करत असाल तर 'या' 5 ठिकाणांना भेट देऊ शकता. वाराणसीत 12 ज्योतिर्लिंगांपैकी श्री काशी विश्वनाथ मंदिर हे मुख्य आहे. अलीकडेच बाबा विश्वनाथांचे अप्रतिम भव्य आणि नवीन धाम तयार करण्यात आले आहे. काशीचे सौंदर्य पाहिल्याशिवाय काशीला भेट देणे अपूर्ण आहे. बनारस हिंदू विद्यापीठ म्हणजेच BHU मध्ये बांधलेले नवीन विश्वनाथ मंदिर अतिशय सुंदर आहे. पांढऱ्या दगडांनी बनलेले हे मंदिर भाविकांच्या श्रद्धेबरोबरच पर्यटनाचेही केंद्र आहे. संध्याकाळी मंदिर रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघते. बनारसचे सारनाथ सुद्धा परदेशी पाहुण्यांबरोबरच देशी पर्यटकांनाही खूप आवडते. ऐतिहासिक बौद्ध मंदिर, धमेख स्तूप, चौखंडी स्तूप याशिवाय एक संग्रहालय आणि एक लहान प्राणीसंग्रहालय आहे. शांततेचे क्षण घालवण्यासाठी पर्यटक येथे येतात. जर तुम्ही वाराणसीला भेट देण्यासाठी येत असाल, तर गंगा नदीवर लक्झरी क्रूझची सफर नक्की करा. ही क्रूझ रविदास घाट ते राजघाटापर्यंत चालवली जाते. या क्रूझमधून काशीच्या सुबह-ए-बनारसच्या विहंगम दृश्याचा आनंद लुटता येतो.टॅग्स :वाराणसीट्रॅव्हल टिप्सVaranasiTravel Tips