vehicles plying in 25 feet snow in rohtang himachal
'या' रस्त्यावर धोकाच धोका, 25 फूट बर्फातून गाडीला काढावा लागतो मार्ग By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 10:39 PM2019-05-09T22:39:23+5:302019-05-09T22:51:34+5:30Join usJoin usNext हिमाचलमधल्या 13050 फूट उंचावर असलेल्या एका रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे एक प्रकारची जोखीमच आहे. या रस्त्याच्या दुतर्फा 20 ते 25 फूट उंच बर्फाच्या भिंती असून, वाहन चालवतानाही सावधानता बाळगावी लागते. इथल्या प्रवासात जोखीम असली तरी परिसर हा विलोभनीय आहे. हा रस्ता दुसरी तिसरा कुठला नसून रोहतांग पास आहे. रोहतांगला मढीपर्यंत पर्यटक वाहनांनी जाऊ शकतात. इथला परिसर नयनरम्य असल्यानं पर्यटकही मोठ्या संख्येनं उपस्थिती लावतात. लाहोलला जाणारे लोक पायी मढीवरून पुढे रोहतांग पास करतात. रोहतांगमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्यानं या रस्त्यावर बर्फाचे ढिगारे असतात. ते ढिगारे बाजूना करून वाहन चालकांना मार्ग काढावा लागतो. टॅग्स :हिमाचल प्रदेशHimachal Pradesh