Visit 10 'Famous Tourist Places' in Punjab!
पंजाबमधील 'या' 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या! By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 03:26 PM2018-12-15T15:26:35+5:302018-12-15T15:31:37+5:30Join usJoin usNext अमृतसर - पंजाबला शिखांची नगरी असंही म्हटलं जातं. पंजाबच्या खान-पान, पेहरावात एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. पंजाबमधलं अमृतसर फारच प्रसिद्ध आहे. अमृतसरमधल्या सुवर्णमंदिरात दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. चंदीगड- पंजाबची राजधानी असलेलं चंदीगडही प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. इथे रोज गार्डन, फन सिटी, रॉक गार्डनसारखी फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. शिशमहल- पंजाबला भारताची शान संबोधलं जातं. इथली शेती आणि हिरवळ नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असते. पंजाबमधलं फार जुनं असलेलं शिशमहलही पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. जालंधर- पंजाबमधलं जालंधर शहर पर्यटनासाठी चांगला पर्याय आहे. इथे आपल्याला देवी तलाव मंदिर, वंडरलँड थीम पार्क, सेंट मेरी कॅथेड्रल चर्च, निक्कू पार्क आदी ठिकाणं नावाजलेली आहेत. आनंदपूर साहिब- आनंदपूर साहिब हे प्रसिद्ध गुरुद्वारांपैकी एक आहे. इथे भाविकांची कायमच गर्दी असते. लुधियाना- लुधियानात फिरण्यासाठी लोधी फोर्ट, रुरल हेरिटेज म्युझिअम, टायगर जू, नेहरू रोज गार्डन प्रसिद्ध आहे. बठिंडा- पंजाबमधल्या बठिंडामध्ये अनेक ठिकाणं पर्यटकांना आकर्षित करतात. रोपड- आनंदपूर साहिबसारखं रोपड वेटलँडही पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. इथलं गुरुद्वारा साहिब आणि जुनं शिव मंदिर पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. कपूरथला- कपूरथलामध्ये आपण पंज मंदिर, जगजित क्लब सारखी ठिकाणांची भटकंती करू शकतो. तसेच इथल्या शालीमार गार्डनमध्येही पूर्ण दिवस व्यतित करता येतो. पठाणकोट- पठाणकोटमध्ये मुक्तेश्वर मंदिर, आशापूर्णी मंदिर, प्राचीन कालीमाता मंदिर, नुरपूर किल्ला आदी ठिकाणं आपल्याला पाहता येतात. तसेच इथे ऐतिहासिक शाहपुर्कंदी किल्लाही आहे. टॅग्स :पंजाबPunjab