Visit 'these' places in Mumbai in the monsoon!
मुंबई नव्हे, तर मान्सूनमध्ये महाराष्ट्रातल्या 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या ! By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 04:54 PM2019-06-13T16:54:43+5:302019-06-13T16:59:18+5:30Join usJoin usNext आंबोली- आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाण आहे. सावंतवाडी तालुक्यापासून आंबोली 30 किलोमीटर अंतरावर आहे. महाबळेश्वर- साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गोवित्री या 5 नद्या उगम पावतात. येथे पंचगंगेचे सुंदर देऊळही आहे. सावित्री ही नदी पश्चिमवाहिनी आहे तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिनी आहेत. महाबळेश्वरमधला वेण्णा तलाव म्हणजे तर पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. वाघाचे पाणी या नावाचा मोठा जलाशय येथे आहे. येथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात असा समज आहे. भंडारदरा- पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी भंडारदरा हे आवडतं ठिकाण आहे. पावसाळ्यात भंडारदऱ्यात निसर्गरम्य वातावरण असतं. भंडारदऱ्यात 'काजवा महोत्सव' हा नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असतो. लोणावळा- शहर हे निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक आहे. लोणावळा व खंडाळा शहराचा निसर्गरम्य परिसर, हिरव्यागार डोंगररांगा, त्यातून वाहणारे धबधबे, सकाळी व सायंकाळी डोंगरकपारीतील धुक्याची चादर असा हा सर्व निसर्गरम्य परिसर मनाला हवाहवासा वाटतो. लोणावळ्याच्या आजूबाजूला असणारे गडकिल्ले व लेण्या येथील इतिहास व प्राचीनतेची साक्ष देतात. माळशेज- पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटही पावसाळ्यात पाहण्यासारखा असतो. पावसाळ्यात माळशेज घाटात अनोखं सौंदर्य पाहायला मिळतं. मुंबईपासून 150 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं माळशेज पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्समानसून स्पेशलकोकणTravel TipsMonsoon Specialkonkan