काय आहे, डार्क टुरिझम? 'या' सात ठिकाणी वाढतेय देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 04:17 PM2019-09-18T16:17:38+5:302019-09-18T16:24:53+5:30

गुजरी महल म्युझियम : ग्वालियरमधील गुजरी महल म्युझियमची खासियत म्हणेज याठिकाणी कांस्य प्रतिमा, शिलालेख आणि सिक्के आहेत. मात्र, या म्युझियमच्या मागील बाजूच्या परिसरात ब्रिटीश अधिकाऱ्यांची स्मशानभूमी आहे. ही स्मशानभूमी 1857 च्या क्रांतीदरम्यानची आहे. याठिकाणी लढाईत मृत्यू झालेल्या ब्रिटिशांना दफन करण्यात आले आहे.

जलियानवाला बाग : जलियानवाला बाग हे ठिकाण ब्रिटिशांच्या अत्याचाराची क्रूर निशाणी म्हणून ओळखले जाते. इतिहासाची आवड असणारे पर्यटक याठिकाणी आवश्य भेट देतात.

गुजरी महल म्युझियम : ग्वालियरमधील गुजरी महल म्युझियमची खासियत म्हणेज याठिकाणी कांस्य प्रतिमा, शिलालेख आणि सिक्के आहेत. मात्र, या म्युझियमच्या मागील बाजूच्या परिसरात ब्रिटीश अधिकाऱ्यांची स्मशानभूमी आहे. ही स्मशानभूमी 1857 च्या क्रांतीदरम्यानची आहे. याठिकाणी लढाईत मृत्यू झालेल्या ब्रिटिशांना दफन करण्यात आले आहे.

झाशीचा किल्ला : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा हा किल्ला. हा किल्ला बंगरा नावाच्या पर्वतावर उभा आहे. राणी लक्ष्‍मीबाई 1858 मध्‍ये इंग्रजांशी लढताना शहीद झाल्या. त्यांच्या शौर्याचे किस्से आजही लोकांमध्‍ये चर्चेचा विषय आहे. हेच शौर्य दाखवणारा झाशी राणी लक्ष्‍मीबाईंचा किल्ला आजही इतिहासाची साक्ष देतो.

श्रीलंका का सेंट सेबेस्टियन चर्च : परदेशातल कमी बजेटमधील ट्रीप म्हणून श्रीलंका पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. मात्र, 21 एप्रिल 2019 रोजी ईस्‍टरच्या वेळी झालेल्‍या बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण देश हादरुन गेला. यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी याठिकाणी अनेक जण येत असल्यामुळे हे ठिकाण प्रसिद्ध होत आहे.

वर्ल्ड ट्रेड सेंटर : न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेतील सरकारने याला डार्क टुरिझम म्हणून विकसित केले आहे. याठिकाणी अनेक पर्यटक दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असतात.

पोलंडमधील ऑशव्हिट्स एकाग्रता शिबिर : पर्यटकांसाठी हे ठिकाण जास्तच आकर्षित करते. दुसऱ्या महा युद्धावेळी याठिकाणी सर्वात मोठ्या एकाग्रता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये शेकडो लोकांना ठेवण्यात आले होते.

कंबोडियाचे टोल स्लेंग संग्रहायल : या संग्रहालयाच्या माध्यमातून कंबोडियात नरसंहार झाल्याच्या इतिहासाची प्रचिती दिसून येते. येथील क्रूर शासकाने अनेक लोकांना ठार केले होते. या मरण पावलेल्या लोकांच्या कवट्या या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. याठिकणी अनेक पर्यटक भेट देतात.