world smallest museum opens in british vintage telephone booth in yorkshire england
वाह क्या 'म्युझियम' है... 'टेलिफोन बूथ'च्या बाहेर रांगाच रांगा By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 10:44 PM2019-04-02T22:44:47+5:302019-04-02T22:51:11+5:30Join usJoin usNext इंग्लंडच्या यॉर्कशायरमधील पश्चिम भागात एका जुन्या टेलिफोन बुथला म्युझियमचं स्वरूप देण्यात आलं आहे. वॉरले कम्युनिटी असोसिएशननं जगातल्या या सर्वात लहान म्युझियमची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे हा म्युझियम फक्त 36 वर्ग खोलीत पसरलेला आहे. या छोट्याशा जागेत अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत. यात आर्टिफॅक्ट्स, जुने फोटो आणि जुन्या नक्षीकामातील दागिन्यांचा समावेश आहे. या म्युझियमचं नाव द मेपोल इन ठेवलं आहे. हे टेलिफोन बूथ म्युझियम पाहण्यासाठी प्रत्येक दिवशी अनेक लोक जातात. प्रत्येक तीन महिन्यांनी म्युझियममधील सामानांत बदल केला जातो. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सTravel Tips