This is The world's largest airplane
जगातील सर्वात मोठ्या असलेल्या या विमानात आहेत 5 स्टार हॉटेलसारख्या सुविधा By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 10:44 PM2018-11-26T22:44:41+5:302018-11-26T22:59:52+5:30Join usJoin usNext जगातील सर्वात मोठे विमान असलेले एअर लायनर 10 विमान प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाले आहे. हायब्रिड एअर व्हेइकल या कंपनीने हे विमान विकसित केले असून, या विमानामध्ये प्रवाशांसाठी फाइव्ह स्टार हॉटेलसारख्या सुविधा आहेत. एअर लँडर 10 चे इन्टिरियअर Q शेपमध्ये विकसित करण्यात आले आहे. जिथे प्रवाशांना फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये असल्याचा फिल येईल. या विमानामध्ये प्रवाशांच्या केबिनमध्ये विशिष्ट्य प्रकारच्या काचा लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना बाहेरचा नजारा पाहता येतो. एअर लँडर 10 न थांबता सलग तीन दिवस उड्डाण करू शकते. तसेच या विमानाची प्रवासी क्षमता 19 आहे. हे विमान विमान आणि हेलिकॉप्टरचे तंत्रज्ञान वापरून विकसित करण्यात आले आहे. हे विमान ताशी 148 किमी वेगाने उड्डाण करू शकते. टॅग्स :विमानतंत्रज्ञानairplanetechnology