Worlds largest cave son doong vietnam
'ही' आहे जगातील सर्वात मोठी गुहा; आत नदी, झऱ्यांसोबतच दडली आहेत अनेक रहस्य By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 04:42 PM2019-03-27T16:42:46+5:302019-03-27T16:47:27+5:30Join usJoin usNext व्हिएतनामधील 'Hang Son Doong' नावाची गुहा जगातील सर्वात मोठी गुहा आहे. असं सांगितलं जातं की, 1991मध्ये 'हो खान' नावाच्या एका माणसाने ही गुहा शोधून काढली होती. परंतु आतमधून येणारा पाण्याचा आवाज आणि काळाकुट्ट अंधार यामुळे गुहेच्या आतमध्ये जाण्याची कोणीही हिम्मत केली नव्हती. त्यानंतर तब्बल 18 वर्षांपर्यंत म्हणजेच, 2009पर्यंत लोकांना या गुहेबाबत अजिबात माहीत नव्हते. असं सागितलं जातं की, या गुहेच्या आतमध्ये एक वेगळं जग आहे. त्याचबरोबर आतमधून फार भयंकर आवाजही येत असतं. 2009मध्ये ब्रिटिश केव्ह रिसर्च असोसिएशनने एक उपक्रम हाती घेत पहिल्यांदा 'Hang Son Doong' या गुहेच्या आतील दृश्य लोकांना दाखवली. पण तरिसुद्धा लोकं या गुहेच्या आतमधील दृश्यांपासून दूर होते. त्याचं कारण होतं या गुहेमध्ये असलेली एक विशाल उंचीची भिंत. वैज्ञानिकांनी 2010मध्ये 200 मीटर उंच असलेली भिंत पार करून गुहेच्या आतमध्ये जाण्याचा रस्ता शोधून काढला. व्हिएतनाममधील जंगलांमध्ये असलेली ही गुहा, त्याच जंगलामध्ये असलेल्या दुसऱ्या गुहेपेक्षा जवळपास 5 पटिंनी मोठी आहे. दरम्यान, पहिल्यांदा मलेशियातील 'Deer Cave' ही जगातील सर्वात मोठी गुहा होती. परंतु 'Hang Son Doong', 'Deer Cave' पेक्षाही दुप्पट मोठी आहे. 'Hang Son Doong' चा काही भाग तुटलेला आहे. जिथे तुम्हाला एक छोटलं जंगल पाहता येतं. 2013मध्ये ही गुहा पर्यटकांसाठी खुली करण्यात आली होती. तरिदेखील प्रत्येकवर्षी येथे फक्त 220 लोकांनाच जाण्याची परवानगी देण्यात येते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, ही गुहा 9 किलोमीटर लांब, 200 मीटर रूंद आणि 150 मीटर उंच आहे. याव्यतिरिक्त या गुहेच्या आतमध्ये एक नदीदेखील वाहते. या उपक्रमामध्ये जवळपास 24 लोकांचा समावेश होता. ज्यामध्ये पोर्टर, वैज्ञानिक, फोटोग्राफर आणि कॅमेरामन यांचादेखील सहभाग होता. या गुहेच्या आतमध्ये तुम्हाला 'Hand of Dog' सोबतच इतरही अनेर रचना पाहायला मिळतील. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सपर्यटनजरा हटकेTravel TipstourismJara hatke