You will surely be afraid to go to 'this' place in China
चीनमधील 'या' ठिकाणी फिरायला तुम्हाला नक्कीच भीती वाटेल By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 06:17 PM2018-09-29T18:17:19+5:302018-09-29T18:34:25+5:30Join usJoin usNext जमिनीपासून अनेक मीटर उंचीवर उभं राहून निसर्ग सौर्द्याचा आनंद घ्यायला प्रत्येकालाच आवडेल. मात्र चीनमध्ये अशी काही ठिकाणं आहेत जिथे फिरायला जायला नक्कीच भीती वाटेल. चीनच्या हुनान प्रांतातील झांगजियाजी कॅनयानवर चीनने जगातील सर्वात उंच आणि सर्वात लांब काचेचा पुल बांधला आहे. या पुलाची लांबी 488 मीटर असून जमिनीपासून तो 218 मीटर उंचीवर आहे. चीनमधील हा सुंदर काचेचा पूल तयार करण्यासाठी तब्बल 2 हजार कामगारांची गरज लागली आहे. तसेच हा पूल तयार होण्यासाठी जवळपास 44 हजार कोटींहून खर्च आला असल्याचंही सांगण्यात येतं आहे. काचेच्या हा पूल म्हणजे निसर्ग, थरार आणि तंत्रज्ञानाची किमया जवळून पाहण्याची अनोखी संधी आहे. इस्त्रायल आर्किटेक्चर हेम डोटन यांनी हा पूल बांधला असून अवघ्या दीड वर्षात हा पूल बांधण्यात आला आहे. बीजिंगमध्ये बांधण्यात आलेला हा जगातील मोठा काचेचा स्कायवॉक आहे. ग्रँड कॅन्यन स्कायवॉक पेक्षा हा 11 मीटर लांब आहे. सात किलोमीटर असलेल्या जगातील सर्वात लांब केबल कार राईडचा आनंद चीनमध्ये घेता येतो. 30 मिनिटाच्या केबल कार राईडचा अनुभव अत्यंत थरारक आहे. माउंट हुआशनवर तयार करण्यात आलेला हा अत्यंत धोकादायक हायकिंग ट्रेल आहे. 2090 मीटर ऊंचीच्या खडकाला कापून हा रस्ता तयार करण्यात आला आहे.टॅग्स :चीनchina