WWE महिला कुस्तीपटू बदलत होती कपडे, अचानक रुममध्ये पोहोचला चाहता अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 06:42 PM2019-11-25T18:42:53+5:302019-11-25T18:46:18+5:30

अ‍ॅलेक्सा ब्लिस... WWE महिला कुस्तीपटूंमधलं नावाजलेल नाव. पण, ही सुपरस्टार काही दिवसांपासून WWE रिंगपासून दूर आहे. दुखापतीमुळे तिनं विश्रांती घेण्याचा निर्णय घेता आहे.

तिनं काही दिवसांपूर्वी याबाबत अधिकृत घोषणाही केली होती. त्यात तिनं लवकरच पुनरागमन करणार असल्याचे सांगितले होते. Surviver Series मध्ये ती कमबॅक करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

विश्रांतीवर जाण्यापूर्वी अ‍ॅलेक्सा ब्लिससोबत एक असा प्रसंग घडला की त्याची चर्चा दीर्घकाळ रंगली.

14 फेब्रुवारी 2019मध्ये WWEच्या RAW स्पर्धेदरम्यानचा हा प्रसंग आहे. यावेळी अ‍ॅलेक्साच्या रुममध्ये WWEमध्ये ट्रेनिंग घेत असलेल्या स्टाफमधील एक सदस्य घुसला.

हा सदस्य जेव्हा रुममध्ये शिरला त्यावेळी अ‍ॅलेक्सा कपडे बदलत होती. या प्रसंगानंतर अ‍ॅलेक्सा प्रचंड वैतागली आणि तिनं त्वरीत त्याला रुमबाहेर जाण्यास सांगितले.

तो सदस्यही घाबरला आणि त्यानं डोळे बंद केले. हा सदस्य अ‍ॅलेक्साचा फॅन आहे.

रुममध्ये जाण्यापूर्वी त्यानं अ‍ॅलेक्साला बाहेरून आवाजही दिला. पण, आतमधून कोणताही प्रतिसाद न आल्यानं तो रुममध्ये शिरला. तेव्हा अ‍ॅलेक्सा टॉपलेस होती.