बघावं ते नवलच; WWE च्या रिंगमध्ये कुस्तीऐवजी रंगला Romance!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 13:21 IST2019-10-02T13:16:01+5:302019-10-02T13:21:02+5:30

WWEच्या रिंगमध्ये बुधवारी अनपेक्षित प्रकार घडला. WWE चॅम्पियनशिपचा सामना सुरु असताना बॉबी लॅश्लीनं रिंगमध्ये फाईट करत असलेल्या रुसेव्हची हवा टाईट केली. पण, त्यानं रुसेव्हसोबत मारामारी न करताचा त्याला रडकुंडीला आणले.
रुसेव्हची मॅच सुरु असताना बॉबी लॅश्लीनं अचानक स्टेडियममध्ये एन्ट्री घेतली. काही वेळानंतर त्यानं लाना ( महिला रेसरल) बोलावलं आणि रुसेव्ह मॅच सोडून लॅश्लीकडे पाहत राहिला.
लाना ही रुसेव्हची पत्नी आणि WWEची रेसलर आहे. 2016मध्ये रुसेव्ह व लाना यांनी लग्न केले. पण, मॅच सुरू असताना अचानक लाना आल्यानं त्याला धक्काच बसला. पण, त्यानंतर जे घडले हे त्यालाही अपेक्षित नव्हते.
WWEच्या रिंगमध्ये लाना आणि लॅश्ली यांचा रोमान्स सुरू झाला. या दोघांचे लिपलॉप पाहून रुसेव्ह अचंबित झाला.
लाना आणि लॅश्लीच्या या लिपलॉपच्या व्हिडीओनं सोशल मीडियावरही धुमाकूळ घातली आणि अनेक विक्रमही मोडले.
अवघ्या नऊ तासात या व्हिडीओनं 1.1 मिलियन प्रेक्षक कमावले.