'Sex Video' destroys WWF superstar Chyanaa's life, know about her journey svg
'Sex Video'मुळे महिला खेळाडूचं आयुष्य झालं होतं उद्ध्वस्त; तीन दिवस घरातच होता मृतदेह By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 11:12 AM2020-04-23T11:12:19+5:302020-04-23T11:26:13+5:30Join usJoin usNext स्टोन कोल्ड स्टी ऑस्टीन, दी रॉक, ट्रिपल एच, अंडरटेकर, केन.... या सर्व WWF स्टार्सनी 1990 ते 2000 च्या दशकात भारतीय युवकांवर भुरळ पाडली होती. WWF हा कुस्तीचा प्रकार जगभरात प्रसिद्ध असला तरी भारतीयांसाठी तो नवाच होता आणि अल्पावधीतच बच्चे कंपनीपासून ते युवकांपर्यंत या खेळानं भारतीयांना आपलेसे केले. या पुरुष खेळाडूंचे प्रभुत्व असलेल्या या खेळात एक महिला कुस्तीपटू अशी होती की पुरुषांनाही टक्कर द्यायची. चायना या नावानं ती सर्वांच्या ओळखीची होती. यशोशिखरावर विराजमान असलेल्या चायनाकडून एक चूक घडली आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तीन दिवस तिचा मृतदेह घरातच होता. चायनाचं खरं नाव जोएन लॉरर असे होते. 1995 मध्ये तिनं कुस्तीचा सराव सुरू केला आणि 16 फेब्रुवारी 1997मध्ये तिनं WWFमध्ये पदार्पण केले. पुरुषांसोबत WWFच्या रिंगमध्ये कुस्ती लढणारी ती पहिली महिला खेळाडू होती. 1999मध्ये तिनं WWFचा इंटरकाँटिनेंटल पुरस्कार जिंकला. 2000 मध्ये तिनं किंग ऑफ द रिंग किताब जिंकला आणि जगभरात ती प्रसिद्ध झाली. याच कालावधीत चायनानं प्ले बॉय या मॅगझीनसाठी न्यूड फोटोशूट केले आणि त्यामुळे तिच्या WWF कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. 2001मध्ये तिनं WWFमधून राजीनामा दिला. तिच्या या राजीनाम्यामागचं कारण कुणालाही माहीत नाही. WWFनंतर तिनं न्यू जपान प्रो रेसलिंगसोबत करार केला, परंतु तिथे ती फार काळ रमली नाही. 2004मध्ये चायनानं पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले आणि तिनं बॉयफ्रेंडसोबत एक 'Sex Video' तयार केला. चायनाचा हा व्हिडीओ जगभरात प्रसिद्ध झाला. 2006मध्ये तिनं अडल्ट मुव्ही पुरस्कार जिंकला. त्यानंतर तिनं 2009, 2011, 2012 आणि 2013मध्ये पॉर्न चित्रपटात काम केले. तिनं या दरम्यान टिव्ही सीरिज आणि हॉलिवूड चित्रपटातही काम केले. पॉर्न फिल्म आणि चित्रपटात काम करताना चायना व्यसनाच्या आहारी गेली होती. 20 एप्रिल 2016मध्ये तिच्या राहत्या घरी तिचा मृतदेह आढळला. पोलिसांच्या अहवालानुसार ड्रग्सच्या अतिसेवनानं तिचा मृत्यू झाला होता. पोस्टमॉर्टन रिपोर्टनुसार तिचा मृत्यू 17 एप्रिललाच झाला होता. तिने दारूसह खुप ड्रग्स घेतले होते आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. टॅग्स :डब्लू डब्लू ईWWE