WWE SuperStarची फजिती; जिच्यासाठी पत्नीला सोडलं, तिनं दुसऱ्याशीच केला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 15:39 IST2020-01-07T15:36:12+5:302020-01-07T15:39:29+5:30

WWE सुपरस्टार जॉन सीना याच्या Ex Girlfriend आणि WWE ची Diva चॅम्पियन निकी बेलानं नुकताच प्रोफेशनल डान्सर आर्टेम चिंगव्हिटसेव्हसह साखरपुडा केला. निकी बेलानं सोशल मीडियावरून ही घोषणा केली.

निकी आणि जॉन सीन हे 2012पासून एकमेकांना डेट करत होते, परंतु त्यांचे नाते तुटले.

2015मध्ये जॉन सीनानं तिला प्रपोज केले होते. तीन वर्षानंतर या लव्ह स्टोरीचा एन्ड झाला.

अमेरिकेतील डान्स रिअॅलिटी शोमध्ये निकी बेला आणि आर्टेम यांनी एकत्रित सहभाग घेतला होता.

हे दोघेही 2017पासून एकमेकांना ओळखतात. मात्र, मार्च 2019पासून त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केले.

जॉन सीना निकी बेलाच्या प्रेमात पार बुडाला होता. या दोघांचं नात जवळपास 6 वर्ष टिकले. निकी बेलासाठी जॉन सीनानं त्याच्या पत्नीसोबत काडीमोड घेतला होता.

2017मध्ये जॉन सीनानं गुडघ्यावर बसून निकीला रिंगमध्येच प्रपोज केले होते.

मात्र, लग्नाला तीन आठवडे शिल्लक असताना निकी बेलानं हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला.