WWE सुपर स्टार जॉन सिना पुन्हा अडकला लग्न बंधनात!

By स्वदेश घाणेकर | Updated: October 16, 2020 16:02 IST2020-10-16T16:00:20+5:302020-10-16T16:02:51+5:30

WWE सुपर स्टार जॉन सिना पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकला आहे. त्यानं नुकतंच प्रेयसी शाय शारीत्झादेह हिच्याशी विवाह केला.

१२ ऑक्टोबरला फ्लोरिडा येथे हा विवाह सोहळा संपन्न झाला. त्यांच्या लग्नाला कुटुंबातील काही सदस्य, मित्र आणि WWEमधील काही सहकारी असे मोजकिच लोकं उपस्थित होती.

सिना आणि शारित्झादेह हे मार्च २०१९पासून एकमेकांना डेट करत आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी साखरपुडा केला. शारित्झादेह हिच्या अंगठीनं चर्चांना उधाण आलं होतं.

याआधी २००९मध्ये सिनानं एलिझाबेथ हुबरडीयू हिच्याशी लग्न केलं होतं आणि २०१२मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

२०१८मध्ये सिना आणि निक्की बेल्ला यांच्यातील सहा वर्षांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले. बेल्लाने डान्सर आर्टेम चिंग्वित्सेव्हशी लग्न केलं.