शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मी म्हातारा झालो नाही, सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'; शरद पवारांचा निर्धार
2
Maharashtra Election 2024: ठाकरे विरुद्ध शिंदे... विदर्भात कोणत्या शिवसेनेची डरकाळी? समजून घ्या गणित
3
“महाराष्ट्राची निवडणूक देशाचे भविष्य बदलणारी, मविआचे सरकार आणा”: मल्लिकार्जुन खरगे
4
जयश्री पाटील यांची बंडखोरी अन् उमेदवारी, विशाल पाटील-विश्वजित कदम आमनेसामने; कोण बाजी मारेल?
5
“मोदीसाहेब भाषणे देण्यात हुशार, पण शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकणार नाही”: शरद पवार
6
Video - दे दणादण! बसमध्ये कंडक्टर-प्रवाशामध्ये तुफान राडा; लाथाबुक्क्यांनी केली मारहाण
7
अजित पवारांना भाजपने उमेदवारासहित जागा का दिल्या? विनोद तावडेंनी सांगितलं कारण
8
"वारे उबाठा तुझं हिंदुत्व...! आरे आम्हाला सांगा, आम्ही बिनविरोध निडून देतो, पण..."; संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप
9
ओबीसी, दलितांचे आरक्षण कमी करुन ते मुस्लिमांना देण्याचा महाविकास आघाडीचा घाट - अमित शाह
10
बायको अन् लेकीविषयी बोलत होता वरुण धवन, तिकडे समंथाचा चेहराच पडला, Video व्हायरल
11
मविआतील मुख्यमंत्रीपदाचा दावेदार ठरला? शरद पवारांनी थेट फॉर्म्युला सांगितला, म्हणाले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'बेरोजगारांना ४ हजार रुपये देणार'; महाविकास आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध केला
13
'बटोगे तो कटोगे',भाजपाच्या कार्यकर्त्यांने थेट लग्नपत्रिकेवरच सीएम योगींचा नारा छापला
14
कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड अटकेत, दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूशी कनेक्शन
15
लाडक्या बहिणींना २१०० रुपये, २५ लाख नवीन नोकऱ्या...; भाजपच्या संकल्प पत्रात काय-काय?
16
बाबा सिद्दिकींवरील हल्ला फेल झाला असता तर पुण्यातील नेता होता टार्गेटवर; बिश्नोई गँगचा प्लॅन B
17
किशोरी गोडबोलेंच्या लेकीची कमाल! थेट ॲपलची ब्रँड अँबेसिडर बनली सई, पोस्ट व्हायरल
18
१९ वर्षांनी तो परत येतोय! मुकेश खन्नांनी शेअर केली 'शक्तिमान'ची पहिली झलक, पाहा व्हिडीओ
19
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, पवारांचंही नाव घेतलं!
20
"मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे काय राहता", अजित पवारांचं रामराजेंना आव्हान

Pimpri Chinchwad Rain: पवना, मुळा, इंद्रायणी नदीकाठच्या १ हजार जणांना सुरक्षित ठिकाणी हलविले

By विश्वास मोरे | Published: August 04, 2024 5:19 PM

पवना धरणातून सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे शहरातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या होत्या

पिंपरी : अतिवृष्टीमुळे तसेच पवना धरणातून सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे शहरातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीवरील  घरांमध्ये तसेच सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. या स्थळांची पाहणी करून धोकादायक ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या सुमारे १ हजार  नागरिकांना रविवारी महापालिकेच्या वतीने निवारा केंद्रांमध्ये तसेच नातेवाईकांच्या घरी स्थलांतरित केले आहे.  

पूरसदृश्य भागांची पाहणी करून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील व फिल्ड उतरले आहेत. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील बौद्धनगर, आंबेडकर कॉलनी आदी ठिकाणी बचावकार्य केले आहे. यामध्ये सुमारे ३० नागरिकांना भाटनगर पिंपरी शाळा येथे स्थलांतरित केले.  तर ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील जाधवघाट, रावेत आदी परिसरात बचावकार्य करण्यात आले असून २९ नागरिकांना  येथे वाल्हेकरवाडी नवीन मनपा शाळा इमारत येथे स्थलांतरित केले. 

‘क’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रिव्हर रेसिडेन्सी, चिखली जवळील मनपा मैलाशुद्धीकरण केंद्रातील लेबर कॅम्प आदी परिसरात बचावकार्य करण्यात आले असून ८० नागरिकांना भोसरी, तसेच ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत चौदे चाळ, चौदे घाट, विशालनगर, पिंपळे निलख याठिकाणी बचावकार्य करण्यात आले असून सुमारे ५० नागरिकांचे इंगोवले मनपा शाळा, पिंपळेनिलख गावठाण शाळेत स्थलांतरण केले आहे.  ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत रामनगर बोपखेल आदी परिसरात बचावकार्य करण्यात आले असून ८३ नागरिकांना बोपखेल मनपा शाळेतील निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित केले.  तर ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत संजय गांधी नगर, जगताप नगर या ठिकाणी बचावकार्य करण्यात आले असून सुमारे २७ नागरिकांना यशवंतराव चव्हाण प्राथमिक मनपा शाळा तसेच कमला नेहरू मनपा शाळा येथे स्थलांतरित केले आहे. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत जुनी सांगवी येथील मुळानगर, मधुबन सोसायटी येथील ११८ नागरिकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी मनपा शाळा येथे  स्थलांतर केले.  अद्याप शहरातील विविध ठिकाणी नियंत्रण पथके तैनात असून बचावकार्य सुरू आहे. संपुर्ण परिस्थितीवर मुख्य नियंत्रण कक्षाद्वारे बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpavana nagarपवनानगरRainपाऊसDamधरणenvironmentपर्यावरणWaterपाणी