शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

शहराला डेंगीचा विळखा, शहरात १०३ रुग्णांना लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 1:44 AM

पिंपरी : शहरामध्ये साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. मलेरिया, डेंगी या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्वाइन फ्लूने आतापर्यंत २८ रुग्ण दगावले असून, सुमारे १०३ जणांना डेंगीची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत तापाचे ६० हजार ६२० रुग्ण आढळले आहेत. डेंगीचे लागण ...

पिंपरी : शहरामध्ये साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. मलेरिया, डेंगी या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्वाइन फ्लूने आतापर्यंत २८ रुग्ण दगावले असून, सुमारे १०३ जणांना डेंगीची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत तापाचे ६० हजार ६२० रुग्ण आढळले आहेत. डेंगीचे लागण झालेले १०३ रुग्ण, तर संशयित १ हजार २६१ रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आहे. ठिकठिकाणची उघडी गटारे, उघड्या कचराकुंड्या व घाणीचे साम्राज्य यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी किटकजन्य आजारांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या आजारावर महापालिकेच्या व खासगी रुग्णालयांमध्येही उपचार उपलब्ध आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष केले, तर हा आजार प्राणघातक ठरू शकतो. डेंगीची लागण झाल्यावर डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये या लक्षणांमध्ये वाढ होते. उच्च ताप, पुरळ आणि स्नायू यामध्ये तीव्र वेदना होतात. प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात. अशा वेळी रक्तस्राव होण्याची शक्यता असते. रक्तस्राव झाल्यामुळे रक्तदाब वाढून श्वसनप्रक्रियेवर परिणाम होतो. ही शेवटची स्थिती मानली जाते. अशा परिस्थितीमध्ये तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते. ताप आल्यानंतर लगेचच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत. ताप जास्त दिवस अंगावर काढू नये. या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी डासांना आळा घालणे महत्त्वाचे आहे. आपल्या परिसरामध्ये डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. घराजवळ असलेल्या रिकाम्या भांड्यांमध्ये, कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नये. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.डेंगीचा आजार विषाणूजन्यडेंगी हा विषाणूजन्य आजार आहे. त्याचा प्रसार एडिस या डासांमार्फत होतो. आजारी माणसाच्या रक्तातील डेंगी विषाणू इडिस जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसºया निरोगी व्यक्तीच्या शरीरात संक्रमित होतात. हे डास समुद्रसपाटीपासून सुमारे १००० मीटरपर्यंतच्या भागात जिवंत राहतो. इडिस हा एक लहान, काळा डास असून, त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे ५ मिलीमीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला ७ ते ८ दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो. साधारणपणे हा डास सकाळी व संध्याकाळी चावतो.60,620शहरात आतापर्यंत आढळलेले तापाचे रुग्ण1,261डेंगी संशयितरुग्णांची संख्या103डेंगीची लागणझालेले रुग्ण

टॅग्स :dengueडेंग्यूpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड