पिंपरी : आई आजारी असल्याचे खोटे कारण सांगत पैसे घेतले. तसेच ५० लाखांचे कर्ज मिळवून देतो, असे सांगून विश्वास संपादन करून १२ लाख ७० हजार रुपये घेऊन कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळवून न देता फसवणूक केली. हा प्रकार ५ ते १५ जून २०१९ दरम्यान घडला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ दत्तात्रय शितोळे (रा. जुनी सांगवी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सतीश गणपत देशमुख (वय ५०, रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी शितोळे यांनी त्यांची आई आजारी असल्याचे खोटे कारण सांगून फिर्यादी देशमुख यांच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु, देशमुख यांनी एक लाख ८० हजार रुपये आरोपी शितोळे याला दिले. तसेच अशोक बबनराव भगत यांना ५० लाख रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे खोटे सांगून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून १२ लाख ७० हजार रुपये घेऊन त्यांना कुठल्याही प्रकारचे कर्ज मिळवून न देता त्यांचीही फसवणूक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
कर्ज मिळवून देण्याचे सांगून १२ लाख ७० हजारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 8:15 PM