पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महिला सक्षमीकरणांतर्गत महिलांना चारचाकी वाहन चालविण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ त्यासाठी येणाºया खर्चासह शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी सुमारे १३ कोटी २२ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहातील सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या.महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महिलांच्या विकासासाठी व सक्षमीकरणासाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात़ यामध्ये महिलांना चार चाकी हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी येणाºया खर्चास बैठकीत मान्यता दिली.ब, क व इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रायमरी व सेकंडरी वेस्ट कलेक्शन तसेच अ, ड व फ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत सेकंडरी वेस्ट कलेक्शन तसेच अ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्र. १४ व १७ मध्ये तीन टिपर वाहने प्रभाग क्र. १८ व १९ मध्ये २ कॉम्पॅक्टर वाहने घरोघरचा कचरा गोळा करणे व वाहतूक करणे या कामासाठी येणाºया खर्चास मान्यता दिली.ड क्षेत्रीय कार्यालयातील पालिकेचे टाटा एससीई वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहतूक करणे या कामासाठी कामगार पुरविण्यासाठी येणाºया खर्चास व हे काम ३१ आॅक्टोंबरपर्यंत करण्यास मान्यता दिली. अ क्षेत्रीय कार्यालयातील मनपाचे टाटा एससीई वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्रात वाहतूक करण्यासाठीच्या वाहनांवर कामगार पुरविण्यासाठीच्या खर्चास व ३१ आॅक्टोंबरपर्यंत करण्यास मान्यता दिली.कामगारांसाठीच्या खर्चास मान्यतामहापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयातील मनपाचे टाटा एससीई वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहतूक करणे या कामासाठी कामगार पुरविण्यासाठी येणाºया खर्चास व हे काम ३१ आॅक्टोंबरपर्यंत करण्यास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
विकासकामांसाठी १३ कोटी, स्थायी समित, कल्याणकारी योजनांतर्गत खर्चासही बैठकीत दिली मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 3:23 AM