पिंपरी : विम्याचा परतावा न देता पुन्हा विमा काढण्यास सांगितले. या माध्यमातून १५ लाख आठ हजार ९५७ रुपयांची फसवणूक केली. दिघीतील विजयनगर येथे २०१५ ते दि. २२ जुलै २०१९ दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितिका खन्ना, अमन कुमार रस्तोगी, नीलम गुप्ता, रितम सुरी व सक्सेना (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी संजय नारायण मोरे (वय ४४, रा. विजयनगर, दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. नवी दिल्ली येथील एस. बी. इन्शुरन्स ब्रोकर प्रा. लि. या कंपनीत आरोपी एजंट आहेत. त्यांनी फिर्यादी मोरे यांना फोन करून वेगवेगळ्या कंपन्यांचे इन्शुरन्स पॉलीसी काढून त्या पॉलीसीचा परतावा दिला नाही. तसेच पुन्हा नव्याने पॉलीसी काढण्यास सांगून १५ लाख आठ हजार ९५७ रुपयांची फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.