शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

आवास योजनेत दीडशे कोटींचा भ्रष्टाचार- शिवाजीराव आढळराव पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 3:33 AM

राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भाजपाचा भ्रष्टाचार अधिक वेगात सुरू आहे, अशी टीकाही आढळराव पाटील यांनी केली.

पिंपरी : महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या रावेत, चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, डुडुळगाव येथील पंतप्रधान आवास योजनेच्या निविदांची चौकशी करावी, त्यात सुमारे दीडशे कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे, असा दावा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले आहे. पालिकेत होलसेल पद्धतीने भ्रष्टाचार सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भाजपाचा भ्रष्टाचार अधिक वेगात सुरू आहे, अशी टीकाही आढळराव पाटील यांनी केली.पंतप्रधान आवास योजनेच्या कामावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. खासदार आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन गुरुवारी टीका केली. या वेळी जिल्हाप्रमुख राम गावडे, शहर महिला संघटक सुलभा उबाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट उपस्थित होते.कासारवाडी ते नाशिक मार्गाचे काम रखडले आहे़ त्यास राज्यकर्त्यांबरोबरच महापालिकाही जबाबदार आहे. नियोजन नसल्याने विकासकामांवर परिणाम होत आहे. परिणामी महामार्गाचे हजार कोटीचे काम दीडहजार कोटींवर जाणार आहे. पाचशे कोटींचा फटका बसणार आहे. औद्योगिक पट्ट्यातील गुंडगिरी, खंडणी खोरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. पोलीस आयुक्त ही गुंडगिरी थांबवतील, अशी अपेक्षा आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड