चिखली : तळवडे येथील त्रिवेणी हौसींग सोसायटी मधील राजेंद्र दांडगे यांच्या घरातील पार्कींग मधे रात्री दोनच्या सुमारास शाॅर्टसर्किट मुळे आग लागली, वरच्या मजल्यावर भाडेकरू म्हणून अंबादास सुर्यवंशी यांचा परिवार राहतो, घराच्या खाली पार्कींग मधे 16 ईलेक्ट्रीकल बाईक पार्क केल्या होत्या. अचानक शाॅर्टसर्किट झाले आणि सर्वच्या सर्व गाड्या व पार्कींग मधे ठेवलेले फर्निचर जळून खाक झाले.
अग्निशामक विभागाच्या जवानांनी जिवाची बाजी लावून मागील बाजूला असलेले ग्रील तोडून अंबादास सुर्यवंशी (वय 42),चेतन अंबादास सुर्यवंशी (वय 14),लिनेश अंबादास सुर्यवंशी (वय12),या तिघांना सुखरूप बाहेर काढले. तळवडे,प्राधिकरण व वल्लभनगर अग्निशामक विभागाच्या तीन बंबानी तब्बल दोन तासानंतर आगीवर नियंञण मिळवले. रात्री अचानक आग लागली तेव्हा सुर्यवंशी परिवाराला गाढ झोपेत असल्याने कळलेच नाही. आजूबाजूचा गोंधळ ऐकून जाग आली तेव्हा आगीने रौद्र रूप धारण केले होते. संपूर्ण जिना आगिने व्यापला गेला व खाली येण्याचा मार्गच बंद झाल्याने परिवार भयभीत झाला असे अंबादास सुर्यवंशी यांनी सांगितले.