बारामती : जिल्हा क्रीडासंकुल बारामतीमध्ये तालुकास्तर शालेय कराटे स्पर्धा पार पडल्या. तालुक्यातील १७० खेळाडूंनी सहभाग घेतला. जिल्हा क्रीडासंकुल देसाई इस्टेट बारामती या ठिकाणी कराटे क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तहसीलदार हनुमंत पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. बारामती क्रीडाशिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खोमणे अध्यक्षस्थानी होते. या वेळी कब्बडी खेळाडू दादासो आव्हाड, गुणवडीचे माजी सरपंच सतपाल गावडे, प्रा. अशोक देवकर, शारदाबाई पवार विद्यालयाच्या नांगरे, सोमेश्वरचे संजय होळकर आदी उपस्थित होते.
बारामती कराटे असोसिएशनच्या वतीने स्पर्धेचे संयोजन करण्यात आले. रवींद्र कराळे यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांचा सत्कार तालुका क्रीडा अधिकारी राजेशकुमार बागुल व असोसिएशनचे प्रशिक्षक अभिमन्यू इंगुले, महेश डेंगळे, दीपक खरात, राजन शिंदे, मुकेश कांबळे, ओंकार झगडे, ऋषीकेश डेंगळे, आयेशा शेख आदींच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू (नाव, वजनगट व शाळा) पुढीलप्रमाणे : १४ वर्षे वयोगट मुले - दीपराज संदीप जाधव (२० किलो, आर. एन. अग्रवाल टेक्निकल हायस्कूल, बारामती), अजय संतोष साळुंखे (२० ते २५ किलो, झेनाबिया इंग्लिश मी. स्कूल, कटफळ), जय दशरथ साबळे (२५ ते ३० किलो, म.ए.सो. हायस्कूल, बारामती), रोहन जालिंदर भोसले (३० ते ३५ किलो, मएसो हायस्कूल, बारामती), सुमेध शांताराम कांबळे (३५ ते ४० किलो, संत सावता माळी इं.मि. स्कूल, डोर्लेवाडी), अनुज राजेश तावरे (४० ते ४५ किलो, आर.एन. अग्रवाल टेकॅनिकल हायस्कूल, बारामती) हर्ष सचिन भोसले (४५ ते ५० किलो, म.ए.सो. हायस्कूल, बारामती), सचिन महावीर झगडे (५० ते ५५ किलो, म.ए.सो. हायस्कूल, बारामती), सोहम घनश्याम जाधव (५५ ते ६० किलो, व्ही.पी. स्कूल, एमआयडीसी), पार्थ संजय पवार (६५ किलो, व्ही.पी. स्कूल, एमआयडीसी).वर्ष/वयोगट/मुले : ऋषिकेश शंकर मोरे (३५ ते ४० किलो, म.ए.सो. हायस्कूल, बारामती), आयत फिरोज शेख (४० ते ४५ किलो, झेनाबिया इंग्लिश मी. स्कूल, कटफळ), हर्षद शहाजी सागडे (४५ ते ५० किलो, आर.एन. अग्रवाल टेक्निकल हायस्कूल, बारामती), विक्रांत भारत काळे-५० ते ५४ किलो, टी.सी. कॉलेज, बारामती), अभिषेक रामचंद्र कापरे (५८ ते ६२ किलो, व्ही.पी. कॉलेज, बारामती), सुदर्शन सूर्यकांत सपकाळ (७० ते ७४ किलो, म.ए.सो. हायस्कूल, बारामती), आदर्श सचिन खरात (८२ किलोंवरील, सावता माळी इं.मि. स्कूल, डोर्लेवाडी).
१४ वर्षे मुली : तेजश्री सुरेश गोरे (१८ ते २२ किलो, न्यू इंग्लिश स्कूल, डोर्लेवाडी), सवी विपुल शहा (२४ ते २६ किलो, पोदार इंटरनॅशनल स्कूल), साक्षी महेश राऊत (२६ ते ३० किलो, म.ए.सो. हायस्कूल बारामती), रिदा जमीर काझी (३० ते ३४ किलो, झेनाबिया इंग्लिश मी. स्कूल, कटफळ), काश्मिरा गोविंद काळे (३४ ते ३८ किलो, म.ए.सो. हायस्कूल, बारामती), पूजा भाऊराव खाडे (३८ ते ४२ किलो, म.ए.सो. हायस्कूल, बारामती), वेदिका प्रीतम आगवणे (४२ ते ४६ किलो, विनोदकुमार गुजर व्ही.पी. स्कूल), अश्विनी अनिल कचरे (४६ ते ५० किलो, व्ही.पी. स्कूल (सीबीएसई), श्रावणी भारत माने (५० किलोंवरील, झेनाबिया इंग्लिश मी. स्कूल, कटफळ).१७ वर्षे वयोगट मुली : तृप्ती संदीप जाधव (३२ किलोंखालील, म.ए.सो. हायस्कूल, बारामती), वैष्णवी विलास साळुंखे (३२ ते ३६ किलो, शारदाबाई पवार विद्यानिकेतन), अमृता विजय टिळेकर (३६ ते ४० किलो, म.ए.सो. हायस्कूल, बारामती), तेजस्विनी राजेंद्र जगताप (४० ते ४४ किलो, म.ए.सो. हायस्कूल, बारामती), चैत्राली बंडू पवार (४४ ते ४८ किलो, शारदाबाई पवार विद्यालय, माळेगाव), करिश्मा सुनील भोसले (४८ ते ५२ किलो, टी. सी. कॉलेज, बारामती), सोनाली बाळासाहेब आहेरकर (५६ ते ६० किलो, शारदाबाई पवार विद्यानिकेतन), फरजाना रियाज पठाण (६० ते ६४ किलो, म.ए.सो. हायस्कूल, बारामती), हर्षदा नवनाथ गावडे (६८ किलोंवरील, विनोदकुमार गुजर व्ही. पी. स्कूल).४१९ वर्षे वयोगट मुली : श्रुती प्रशांत पानसरे (३६ ते ४० किलो, टी. सी. कॉलेज बारामती), पूजा सुनील सरतापे (४० ते ४४ किलो, श्री. छत्रपती शाहू हायस्कूल, बारामती), वैभवी योगेश शेळके (४४ ते ४८ किलो, म.ए.सो. हायस्कूल, बारामती), श्रावणी राजेश तावरे (४८ ते ५२ किलो, टी.सी. कॉलेज, बारामती), वृषाली उदय गायकवाड (५२ ते ५६ किलो, शारदानगर, माळेगाव), नेहा संतोष साळुंके (५६ ते ६० किलो, शारदानगर, माळेगाव), श्रुती राजू राऊत (६० ते ६४ किलो, टी.सी. कॉलेज, बारामती), प्रतीक्षा हनुमंत जाधव (६८ किलोंवरील).