जुनी सांगवी : येथील सांगवी पोलीस चौकीच्या पीडब्लूडी कॉलनी, ममतानगर, आनंदनगर कॉर्नर व ढोरेनगर कॉर्नर परिसरातील महावितरणाच्या ट्रान्सफार्मवरती मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. सध्या पावसाळा सुरू असून, वरील सर्व ठिकाणे ही दाट नागरी वस्तीच्या परिसरात येत असल्यामुळे भविष्यात शॉर्टसर्किट सारख्या संभाव्य दुर्घटना घडून अपघात होऊ शकतो. याआधी अधून-मधून शॉर्टसर्किट सारख्या घटना घडल्या आहेत.सांगवीतील प्रत्येक डीपीवर वाढलेली धोकादायक झाडे काढावेत आणि संभाव्य अपघात होणार नाही यासाठी सांगवी येथील शिवशक्ती व्यायाम मंडळाचे अध्यक्ष योगेश गायकवाड यांनी महावितरणाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.झाडांमुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किटहोऊन केबल जळून हाय होलटेज निर्माण होते. परिणामी घरातील टीव्ही, फ्रीज सारख्या वस्तूंना हानी पोहचू शकते. अशा घटनांमुळे ट्रान्सफॉर्मरच्या लोखंडी कम्पाउंडला शॉक लागून मृत्यू होऊ शकतो. नागरिकांच्या जिविताशी खेळण्याचा आधिकार महावितरणाला आहे का? असा संतप्त सवालही योगेश गायकवाड यांनी केला आहे. कर्मचाºयांना याविषयी सूचना देण्यात आल्या असून प्रत्यक्ष ठिकाणची परिस्थिती बघून या विषयी समस्या दूर केली जाईल, असे सहायक अभियंता एस. पी. उचेकर, एमएसडीएल सांगवी यांनी सांगितले आहे.
नेहरुनगरमध्ये १८ तास वीज गुल, महावितरणचा सावळा गोंधळ,नागरिकांची गैरसोय; डीपी दुरुस्तीनंतर पुरवठा झाला सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 2:48 AM