वडगाव मावळ : कान्हे (ता. मावळ) येथील महिंद्रा सीआयई कंपनीचा सव्वाकोटी रुपयांचा तोटा झाल्याचे कारण सांगून १ जानेवारीपासून १९५ कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले आहे.त्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेला असंतोष लक्षात घेऊन तहसीलदार रणजित देसाई यांनी सोमवारी तहसील कार्यालयात कंपनीचे अधिकारी कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाºया महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे प्रतिनिधी कामगारांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. लेबर आॅफिसर आर. जी. रुमाले पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, कंपनीचे एचआर प्रमुख विद्याधर भोंगे, फॅक्टरी मॅनेजर प्रमोद मंत्रवादी, निवृत्ती सावे, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, चिटणीस केतन नाईक, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळस्कर, अक्षय पनवेलकर, अक्षय पखडी आदींसह ठेकेदार व कामगार उपस्थित होते.उत्पादन कमी झाल्याने तसेच सव्वाकोटी रुपयांचा तोटा झाल्याने हंगामी कामगारांना तात्पुरते कमी केले आहे. ट्रेनिंग कामगारही कंपनीत मोठ्या प्रमाणात आले आहेत, अशी माहिती कंपनीच्या अधिकाºयांनी बैठकीत दिली. उज्जैनकर यांनी सांगितले की, कंपनीने तोटा झाल्याचे कारण सांगून कामगारांना कामावरून कमी केले आहे. परंतु अशी कारवाई करण्यापूर्वी बॅलन्स शीट सादर केलेले नाही. कामगारांना कमी करण्यापूर्वी ले आॅफसाठी असणाºया कायदेशीर बाबींची पूर्तता केलेली नाही. मनसे कामगार संघटनेचे सदस्य असलेल्या कामगारांवरच आकसाने कारवाई केली आहे. इतर संघटनेच्या कोणत्याही कामगारांनातसेच व्यवस्थापकीय कामगारांना कमी केले नाही.न्याय न मिळाल्यास आंदोलनमनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळस्कर म्हणाले, कामगारांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. तहसीलदार देसाई म्हणाले की, कंपनीतील स्थानिक कामगारांना असे वाºयावर सोडता येणार नाही. सहानभूतीपूर्वक विचार करून त्यांना पुन्हा कामावर घ्यावे. कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार देसाई यांनी दिला. येत्या १३ जानेवारील पुन्हा बैठक घेण्याची सूचना त्यांनी दिली़ तत्पूर्वी वरिष्ठांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.
कंपनीच्या तोट्यामुळे १९५ कामगार बेरोजगार; महिंद्रा सीआयई कंपनीच्या प्रतिनिधींची तहसीलदारांसोबत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 4:10 AM