शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

जनतेचे २० कोटी लुटण्याचा डाव

By admin | Published: April 25, 2017 4:04 AM

ना भय ना भ्रष्टाचार असा नारा देऊन सत्ता मिळविणारे भाजपाचे पदाधिकारी आता भय दाखवून भ्रष्टाचार करत आहेत. मुख्यमंत्री, पालकमंत्री

पिंपरी : ना भय ना भ्रष्टाचार असा नारा देऊन सत्ता मिळविणारे भाजपाचे पदाधिकारी आता भय दाखवून भ्रष्टाचार करत आहेत. मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदारांच्या नावाचा दुरुपयोग करून अधिकारी, ठेकेदारांना वेठीस धरत आहेत. विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांची ४०० कोटी रुपयांची देयके अडकवून ठेवणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनी टक्केवारीपोटी २० कोटी उकळण्याचा डाव रचला आहे, असा गंभीर आरोप स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषदेत केला. महापालिकेत भाजपाच्या सुरू असलेल्या पारदर्शक कारभाराचा समाचार घेतला. प्रशांत शितोळे म्हणाले, ‘‘भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांचे खरे रंग रूप दाखविण्यास सुरुवात केली आहे. सत्ता मिळताच अधिकारी, ठेकेदारांची पद्धतशीरपणे कोंडी सुरू झाली आहे. जुन्या कामाची चौकशी करून, तुम्ही सादर केलेली बिले खोटी आहेत, अशी दमबाजी अधिकारी आणि ठेकेदारांना केली जात आहे. सुमारे ४०० कोटी रुपयांची बिले थकली आहेत. ही बिले काढण्यासाठी २० कोटी रुपयांचा गैरव्यहार केला जाणार आहे.स्वत:ला चाणक्य आणि लॅपटॉप मॅन समजणाऱ्या मास्टरमाइंड स्वत:च्या हुशारीचा फायदा महापालिका भिकारी होईल यासाठी करीत आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्या नावाचा दुरुपयोग केला जात आहे.’’ अर्थसंकल्पावर शितोळे म्हणाले, ‘‘महापालिका सार्वत्रिक निवडणुकीमुळे आयुक्तांना अर्थसंकल्प सादर करण्यास उशीर झाला आहे. महाराष्ट्र प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम ९५ नुसार अर्थसंकल्प ३१ मार्चपूर्वी मंजूर होणे बंधनकारक आहे. तसे न झाल्यास आयुक्तांचा अर्थसंकल्प जैसे थे मंजूर असल्याचे मानले जाते. तथापि, स्थायी समितीने आता त्यात फेरबदल करण्याचे निश्चित केले आहे.’’ (प्रतिनिधी)