पिंपरी : नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारक आळा घालण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांकडून ‘विशेष सेवा पदक’ जाहीर केले जाते. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील २० अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी हे पदक जाहीर केले.
पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील दोन पोलिस निरीक्षक, १८ पोलिस उपनिरीक्षक आणि एक पोलिस कर्मचारी अशा २१ जणांना हे पदक जाहीर झाले. शिरगाव पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक तेजस्विनी कदम यांनी नक्षलग्रस्त भागात साडेतीन वर्ष सेवा केली. दरम्यान, त्यांना सेवाकाळात शंभरपेक्षा अधिक रिवार्ड मिळाले आहेत. त्यामुळे त्यांना ‘विशेष सेवा पदक’ जाहीर झाले. सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बनसोडे यांनी गोंदिया येथे सेवा केली असून त्यांना देखील हे पदक जाहीर झाले.
...यांना जाहीर झाले पदक
पिंपरी-चिंचवड दलातील पोलिस निरीक्षक तेजस्विनी कदम, महेश बनसोडे, पोलिस उपनिरीक्षक सागर देवकर, महेश सातपुते, मिलिंद कुंभार, गणेश आटवे, विठ्ठल सूर्यवंशी, सोहन धोत्रे, बालाजी मेटे, संतोष जायभाये, श्रीकिशन कांदे, दतात्रय सुकाळे, श्रीकांत गुरव, महादेव भालेराव, आबा कटपाळे, राहुल दुधमल, लक्ष्मण मोगले, अनिल टार्फे, चंद्रशेखर मोरखंडे, राजेंद्र पानसरे, पोलिस शिपाई योगेश्वर कोळेकर यांना ‘विशेष सेवा पदक’ जाहीर झाले.