शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
2
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
6
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
7
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
8
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
9
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
11
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
12
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
13
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
14
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
15
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
17
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
18
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
19
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
20
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

मिळकतकर उत्पन्नात २४ कोटींची भर

By admin | Published: July 06, 2017 3:18 AM

मिळकतकराच्या उत्पन्नात भर पडत आहे. पहिल्या तिमाहीत मालमत्ताकरातून १८७ कोटी रुपयांचा महसूल पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : मिळकतकराच्या उत्पन्नात भर पडत आहे. पहिल्या तिमाहीत मालमत्ताकरातून १८७ कोटी रुपयांचा महसूल पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोषागारात जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २४ कोटी रुपयांचा भरणा अधिक झाला आहे. तसेच आॅनलाइन भरणाही वाढला आहे. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे २० लाखांवर पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय पुनरुत्थान अभियानांतर्गत (जेएनएनयुआरएम) शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. सुसज्ज रस्ते, उड्डाणपूल ही शहराची ओळख बनली आहे. येथील पायाभूत सोयी-सुविधा, महापालिकेने उभारलेल्या वैविध्यपूर्ण प्रकल्पांमुळे हा परिसर मालमत्ताधारकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे. त्यामुळे शेकडो मालमत्तांची भर पडत आहे. पयार्याने महापालिकेचा मालमत्ताकर भरणा वाढला आहे. मालमत्ताकर ३० जूनपर्यंत आगाऊ भरणाऱ्यांना सामान्यकरात १० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे आगाऊ करभरणा करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येतो. या सवलतीचा फायदा १ लाख ६९ हजार करदात्यांनी घेतला. त्यांना ९ कोटी ८० लाख रुपये सूट दिली.आॅनलाइनचाही वापर३० जूनअखेरीस रोख अथवा डीडीद्वारे ६७ हजार ४०६ मालमत्ताधारकांनी ३७ कोटी ९२ लाख रुपये करभरणा केला, तर धनादेशाद्वारे २४ हजार ६६४ जणांनी ६७ कोटी १९ लाख रुपये करभरणा केला. असा एक लाख ६९ हजार २५२ करदात्यांकडून १८७ कोटी ४५ लाख रुपयांचा महसूल तिजोरीत जमा झाला, असे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले.