पिंपरी : शहरात विकण्यासाठी आणलेला २४ किलो १०५ ग्रॅम वजनाचा ३ लाख ३६ हजार रूपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. सम्राट चौक वाकड येथे बुधवारी ( दि. ८ ) कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस वंदु दत्तात्रय गिरे यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. श्रीकांत लिंबाजी राठोड, ( वय ३३ ) रा. बालेवाडी, मूळ मुळेगाव सोलापूर, सुनिल लालसिंग राठोड, ( वय ३१ ) रा. मुळेगाव, सोलापूर, तानाजी दगडू पवार, रा. अक्कलकोट, सोलापूर, यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये आरोपींजवळ २४ किलो १०५ ग्रॅम वजनाचा ३ लाख ३६ हजार रूपयांचा गांजा, तीन मोबाईल, एक पाढऱ्या रंगाची मोटार कार असा ६ लाख ६६ हजार रूपयांचा माल मिळून आला.