पिंपरी : थरमॅक्स चौक ते केएसबी चौकादरम्यान मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास रस्त्यावर ऑईल सांडले होते. त्या वेळी या रस्त्याने जाणारे सुमारे २५ दुचाकीस्वार घसरून पडून जखमी झाले. ही बाब सजग नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यावर माती टाकली व वाहतुकीचे नियोजन केले. त्यामुळे पुढील धोका टळला.
चिंचवड ते भोसरीला जाणाऱ्या थरमॅक्स चौक ते केएसबी चौकादरम्यानच्या रस्त्यावर मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास आॅईलचा टँकर भोसरीच्या दिशेने जात असताना ऑईल मोठ्या प्रमाणावर सांडू लागले. ही बाब चालकाच्या लक्षात आली नाही. त्यामुळे टँकरमागे जाणाºया दुचाकी आणि चारचाकी वाहने घसरत होती. ऑईलचे प्रमाण अधिक असल्याने दुचाकी घसरून पडत होत्या. ही बाब कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर नॉव्हेल स्कूलजवळ टँकर अडविण्यात आला. या वेळी भाजपाचे प्रदेश सदस्य अमित गोरखे यांनी तातडीने पोलीस आणि अग्निशामक दलाला बोलावले. तसेच प्रशांत शिंदे, हरिमामा वालोकर, संजय मुळे, मुन्ना शेख या कार्यकर्त्यांनी वाहतूक थांबविली. तसेच अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांच्या मदतीने माती खोदून ऑईल सांडलेल्या रस्त्यावर टाकली. तसेच वाहतूक शाखेचे पोलीसही घटनास्थळी आले. त्यांनी ऑईलच्या रस्त्यावरील वाहतूक वळविली. तसेच आणखी अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांना बोलावून रस्ता धुऊन काढला. तसेच कार्यकर्त्यांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वाहतूक सुरळीत होण्यासाठी सायंकाळी सात वाजले होते.वाहतूक थांबविली : जखमींना रुग्णालयात केले दाखलरस्त्यावर ऑईल सांडत असल्याचे टँकर चालकाच्या लक्षात न आल्याने सुमार एक किलोमीटर अंतरापर्यंत हे ऑईल सांडले होते. त्यामुळे या रस्त्याने जाणारी दुचाकी वाहने घसरून पडत होती. सुमारे पंचवीसेक गाड्या पडल्या. सजग नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक बंद केली होती. जखमींना रुग्णालयात दाखल केले, असे अमित गोरखे यांनी सांगितले.महापालिकेच्या टँकरचा चालक पोलिसांच्या ताब्यातसंबंधित टँकर हा मैला वाहून नेणारा महापालिकेचा टँकर होता. त्यातून ऑईल कसे काय नेले जात होते, याबाबत सजग नागरिकांनी पोलिसांना प्रश्न केला. अपघातास कारणीभूत चालकाला नागरिकांनी फटकेही दिले. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.