पिंपरी : महापालिका, म्हाडा आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात सुमारे पंचवीस हजार घरकुले उपलब्ध होणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशी घरकुले उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसराचा विकास वेगाने होत आहे. स्मार्ट सिटीतही शहराचा समावेश झाला आहे. त्यामुळे मोठमोठे गृहप्रकल्प येथे साकारले जाणार आहेत. जमिनींचे भाव गगणाला भिडल्याने सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न अवघड झाले आहे. त्यामुळे परवडतील अशी घरकुले उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. बांधकाम व्यावसायिकांनीही मोठ्या प्रमाणावर घरकुलांची निर्मिती केली आहे. मात्र, मागणी नसल्याने शहर परिसरात लाखाहून अधिक घरे पडून आहेत. मागणी नाही, त्यामुळे बांधकाम व्यावसायिक चिंतेत आहेत. सदनिकांच्या खरेदीवर परदेश वारी, जीएसटीत सूट, दुचाकी, चार चाकी वाहने अशा विविध सवलत योजना जाहीर करूनही घरांनी मागणी नाही.
तसेच म्हाडाच्या वतीने पिंपरी, हिंजवडी, ताथवडे, तळेगाव, चाकण परिसरातही मोठ्या प्रमाणार घरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पिंपरी, हिंजवडी, ताथवडे परिसरात नवीन चार हजार घरे उपलब्ध होणार आहेत. आठशे पन्नास घरांचा ‘लकी ड्रॉ’ लवकरच काढण्यात येणार आहे. पिंपरीत दहा एकरवर हा गृहप्रकल्प होणार असून, पिंपरी गावात १३०९ घरे आणि ताथवडेतील अकरा एकर जागेवर सुमारे पंधराशे घरे उपलब्ध होणार आहेत.
प्राधिकरणातर्फे बारा हजार घरेपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने वाल्हेकरवाडी परिसरात घरकूलची स्कीम सुरू आहे. तर इंद्रायणीनगर परिसरात सुमारे बारा हजार घरांची योजना तयार केली आहे. त्यात अल्प उत्पन्न गट आणि मध्यम आणि उच्च गटासाठी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ही घरे बाजारातील घरांपेक्षा प्रति चौरस फुटाला कमी भावाने मिळणार आहेत. वाल्हेकरवाडीतील गृहप्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे.महापालिकेचे दहा गृहप्रकल्प
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिका परिसरातील चºहोली, रावेत, आकुर्डी, ताथवडे, वडमुखवाडी, बोºहाडेवस्ती या भागात दहा गृहप्रकल्प होणार आहेत. यामध्ये सुमारे सात हजार घरे उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यात अर्ज मागविण्यात आले आहेत. कामाच्या निविदाही मंजूर केल्या आहेत. त्यानंतर कामास सुरुवात होऊन सर्वसामान्य नागरिकांना घरकुले उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शासकीय घरकुलांचे दर हे बाजारपेठेतील घरांपेक्षा कमी किमतीचे असल्याचे महापालिका अधिका-यांनी सांगितले.