पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघात आचारसंहिता भंगाच्या २५३ तक्रारी दाखल झाल्या असून सर्वच तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे. त्यात ऑनलार्ईन तक्रारींचे प्रमाण अधिक आहे. २४१ तक्रारी ऑनलाईन आणि १२ तक्रारी ऑफलाईन दाखल झाल्या आहेत. निवडणूकीबाबत नागरिकांची सजगता वाढल्याचे दिसून येत आहे. मावळ लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी रंगात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. निवडणुक प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरु आहेत. अॅपवर अधिक तक्रारी निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा बसावा व अनुचित प्रकार टाळण्यासाठी यंदा नागरिकांना ऑनलाइन तक्रारी नोंदविण्यासाठी अॅप विकसित केले आहे. त्यावर नागरिकांच्या तक्रारी अधिक दाखल होत आहेत. मतदारसंघात आचारसंहितेच्या उल्लंघनाची माहिती देण्यासाठी अॅपद्वारे फोटो अथवा दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ काढून तो अपलोड करणे अपेक्षित आहे. तसेच ऑफलाइन तक्रारींची सुविधाही निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.पथनाट्य, फेऱ्या यामाध्यमातून मतदार जागृती केली जात आहे. निवडणूकीत निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या कार्यालयात तसेच ऑनलाईन तक्रारी दाखल करण्यावर भर दिला आहे. पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल, कर्जत, उरण या विधानसभा मतदार संघात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय आहे. तसेच मावळ लोकसभा मतदार संघाचे आकुर्डीतील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात सातव्या मजल्यावर कार्यालय सुरू केले आहे. सुरूवाती कालखंडात खोट्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, त्यांची तपासणी ही काटेकोरपणे होत असल्याने दुसऱ्याआणि महत्वाच्या टप्यात खोट्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. सर्वाधिक तक्रारी पिंपरीत दाखलआचारसंहिता भंगाच्या सर्वाधिक तक्रारी पिंपरीत दाखल झाल्या आहेत. ९२ तक्रारी पिंपरीत तर त्यापाठोपाठ चिंचवडला ८२, मावळला ४४ आणि सर्वांधिक कमी तक्रारी पनवेलमध्ये दाखल झाल्या आहेत. तसेच ऑफलाईन तक्रारी सर्वाधिक चार ह्या पिंपरी विधानसभेत, चिंचवडमध्ये तीन आणि मावळ, उरणमध्ये प्रत्येकी एक तक्रार दाखल झाली आहे. आचारसंहिता भंगाच्या २५३ तक्रारींवर कार्यवाही केली असून सर्वच तक्रारी निकाली काढल्या आहेत. प्रलंबित तक्रारी अजिबात नाहीत...................................विधानसभा तक्रारी ऑनलाईन, ऑफलाईन, कार्यवाही झालेल्या तक्रारीचिंचवड ८८,०४, ९२पनवेल ०३,०० ०३कर्जत ०५, ०१ ०६उरण १८,०२ २०मावळ ४४,०२ ४६पिंपरी ८३, ०३ ८६
२४१, १२ २५३..................................................