शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

‘शिक्षण दर्जा’साठी ३ महिने मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 2:35 AM

शिक्षण समिती प्रशासनास धरले धारेवर

पिंपरी : प्रगत शाळा उपक्रम महापालिका शाळांत शंभर टक्के राबविणे, डिसेंबरमध्ये होणाऱ्या मूल्यमापन चाचणीत विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे, या विषयीच्या सूचना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शिक्षण समिती प्रशासनास दिल्या. तसेच मूल्यमापन चाचणीच्या सज्जतेसाठी, शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे.शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर तीन महिन्यांपर्ू्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिक्षण समिती निर्माण झाली आहे. तीन महिने होऊनही शिक्षण समितीत सदस्य आणि प्रशासनाचा सूर जुळलेला नाही. विषयपत्रिकेवर एकही विषय न येता, आयत्या वेळी विषय मंजूर केले जात आहे. यावरून राष्टÑवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सत्ताधाºयांना धारेवर धरले होते.महापौरबदल झाल्यानंतर राहुल जाधव यांनी आज आढावा बैठक घेतली. या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे, शिवसेनेच्या सदस्या अश्विनी चिंचवडे, राष्टÑवादीच्या सदस्या विनया तापकीर, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्यासह विभागाचे सर्व अधिकारीउपस्थित होते. या वेळी आयुक्तांनी शिक्षण मंडळाचा आढावा घेतला. तसेच सूचनाही केल्या. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. शैक्षणिक दर्जा वाढीसाठीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, अशा सूचना केल्या. हर्डीकर म्हणाले, ‘‘प्रगत शाळा उपक्रम महापालिकेतील सर्वच शाळांत राबविण्यात यावा. डिसेंबरमध्ये मूल्यमापन चाचणी होणार आहे. महापालिका शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना लेखन, वाचन आले पाहिजे. त्यासाठी येत्या तीन महिन्यांत प्रयत्न करण्यात यावेत, आवश्यक असणारी मदत प्रशासनाकडून केली जाईल.’’शुक्रवारपासून महापालिका शाळांची पाहणीसाहित्य खरेदीवर लक्ष केंद्रित न करता विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. विषयपत्रिकेवर केवळ खरेदीचे विषय आणू नयेत. चर्चेचे विषय आणावेत. शिक्षण समितीच्या सभेला शाळेतील मुख्याध्यापकांना बोलवावे. त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेण्यात याव्यात. चांगले उपक्रम केले असल्यास त्याचे सादरीकरण ठेवावे.शाळांना भौतिक सुविधा पुरविण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या. दिल्लीतील शाळांचे कामकाज पाहण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी आणि सदस्यांनी दिल्ली दौरा करावा, असेही आयुक्तांनी सुचविले. तसेच शुक्रवारपासून महापालिकेच्या शाळांचा पाहणी दौरा करणार आहेत. अचानक शाळांना भेटी देऊन माहिती जाणून घेणार आहे, असे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड