पिंपरी : २०१७-१८ या आर्थिक वर्षात दहावी व बारावी परीक्षेत ८० टक्यांपेक्षा जास्त गुण संपादन केलेले, मात्र कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी लाभ न मिळू शकलेल्या २७४ विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर बक्षीसपर रक्कम देण्यात येणार आहे. त्यासाठी ३२ लाख ४५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.प्रभाग क्रमांक ८ इंद्रायणीनगर येथे ठिकठिकाणी चौकांमध्ये म्युरल्स बसविणे, सुशोभीकरणासाठी सुमारे ५८ लाख १० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. पाणीपुरवठा विभागाकडील कवडेनगर, काटेपुरम परिसरातील जुन्या जलवाहिन्या बदलण्यासाठी सुमारे २७ लाख ३८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरण प्रक्रियेसाठी द्रवरूप क्लोराईड व पावडर पुरविण्यासाठी सुमारे ७२ लाख ७७ हजार रुपये खर्च येणार आहे. महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये इंटरनेट सेवा पुरविण्यात येणार आहे़ त्यासाठी सुमारे २८ लाख ७४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चासह प्रभाग क्र. १९ (नवीन प्रभाग क्र. १६) मधील वाल्हेकरवाडी परिसरातील नाला बांधणे, अनुषंगिक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ४९ लाख ६२ हजार रुपयांच्या खर्चास आणि प्रभाग क्ऱ २१ मध्ये ठिकठिकाणी नाले बांधण्यासाठी येणाºया सुमारे ५० लाख २५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.शहरातील खासगी शाळेत शिकणाºया दारिद्र्यरेषेखालील कुटुंब असलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना २०१८ पासून अर्थसाह्य देण्यात येणार आहे. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्यांना १ लाख रुपये, ८५ ते ८९ टक्के गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये, ८० ते ८४ टक्के गुण मिळवणाºया विद्यार्थ्यांना २५ हजार रुपये बक्षीस रक्कम देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला आहे. याशिवाय शहरातील विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणाºया सुमारे ४ कोटी ९५ लाख ९६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात बुधवारी झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.
गुणवंतांसाठी ३२ लाखांची तरतूद, विकासकामांसाठी पाच कोटींना मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 3:07 AM