महापौरांसह ३३ जणांचे अर्ज दाखल
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी गणेश जयंतीचा मुहूर्त साधून महापौर शकुंतला धराडे यांच्यासह ३३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार आहे. महापौर शकुंतला धराडे यांनी प्रभाग क्रमांक २९ मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक आणि अपक्ष म्हणून एक उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक म्हणून महापौर धराडे यांची ओळख आहे. त्या भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. पिंपळे गुरव प्रभाग अनुसूचित जमात महिला वर्गासाठी राखीव होता. त्यामुळे महापौर भाजपाकडून लढणार की राष्टÑवादीकडून लढणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, महापौरांनी राष्टÑवादीकडून अर्ज दाखल केला आहे. उमेदवारीअर्ज दाखल करण्याच्या पहिले दोन दिवस एकही अर्ज दाखल झाला नव्हता. त्यानंतर तिसºया दिवशी दोन, चौथ्या दिवशी पाच आणि पाचव्या दिवशी ३३ अर्ज दाखल झाले आहेत.
प्रभाग क्रमांक ४ मधून सुरेखा वाळके यांनी शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस, मनसेसाठी असे तीन अर्ज, तर प्रभाग सहासाठी सायली दांगट यांनी भाजपासाठी दोन अर्ज, प्रभाग सातमधून महेश लोंढे यांनी मनसेसाठी, प्रभाग आठमधून नीलेश मुटके यांनी शिवसेनेसाठी, प्रभाग क्रमांक नऊमधून गीता मंचरकर, राहुल भोसले, वैशाली घोडेकर यांनी राष्टÑवादीसाठी, प्रभाग क्रमांक अकरामधून जनाबाई दराडे यांनी भाकप, प्रभाग अकरातून किसन शेवते यांनी भाकपसाठी दोन, संजय ओव्हाळ यांनी दोन, श्यामल ओव्हाळ यांनी दोन अर्ज भाकपसाठी अर्ज सादर केले आहेत. प्रभाग बारामधून शांताराम भालेकर यांनी भाजपा, याच प्रभागासाठी सिद्धेश्वर जाधव यांनी अपक्ष, मनीषा शिंदे यांनी भाजपासाठी अर्ज सादर केले आहेत. प्रभाग क्रमांक १५ मधून कोमल काळभोर यांनी भाजपा, प्रभाग १९साठी काळूराम पवार यांनी राष्टÑवादीसाठी दोन, प्रभाग क्रमांक २७ साठी स्वप्निल नखाते यांनी काँग्रेस, प्रभाग २९ साठी शकुंतला धराडे यांनी राष्टÑवादीकडून, प्रभाग ३०साठी अमोल मोटे यांनी अपक्ष, काँग्रेससाठी, प्रभाग ३१ साठी भारती पाटील यांनी राष्टÑवादी, माधवी राजापुरे यांनी भाजपासाठी, पूर्वा साळुंखे यांनी राष्टÑवादी काँग्रेस पार्टी, प्रभाग ३२मधून सोनल तनपुरे यांनी राष्टÑवादीसाठी अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने यांनी दिली.