पिंपरी : पवना धरण परिसरात पाऊस सुरु आहे. सध्या धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे पवना धरणातून 3500 क्युसेस पाण्याचा विसर्ग पवना नदीत करण्यात येत आहे. पाऊस सुरू राहिल्यास विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पवना धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढवून 3500 क्युसेक करण्यात आला आहे.
पवना नदीतील पाणीपातळी वाढल्याने नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील पाण्याचे पंप, नदीकाठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाकडील पूरनियंत्रण कक्षाने केले आहे.